नवापूर वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजितकुमार जयस्वाल यांना "आदर्श प्राचार्य 2022" पुरस्कार प्राप्त............

नवापूर वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजितकुमार जयस्वाल यांना "आदर्श प्राचार्य 2022" पुरस्कार प्राप्त.....                नवापूर, सत्यप्रकाश न्यूज 
     येथिल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल यांना महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे यांच्या तर्फे यांच्या सामाजिक, शैक्षणीक कर्याबरोवर पर्यावरण संवर्धनात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित शिक्षण परिषदेत "राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य 2022" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
   पुरस्कार वितरण सोहळ्यात निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, प्रदेशाध्यक्ष डी. आर. पाटील, राज्य महासचिव संतोष आबा पाटील, धुळे जिल्हा प्रमुख प्रा. डी. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील, समितीचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जयस्वाल यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, यात प्रमाणपत्र, सन्मानपत्र व छत्रपाती शिवरायांचे आज्ञापत्र यांचा समावेश होता. 
  प्राचार्य डॉ. जयस्वाल यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था नवापूर चे अध्यक्ष श्री. सुरूपसींग नाईक साहेब, कार्याध्यक्ष व नवापूरचे कार्यसम्राट आमदार श्री. शिरीषकुमार नाईक, संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी कौतुक केले.


Post a Comment

Previous Post Next Post