कु.काजल नारायण मराठे एम.एस्सीत गणित विषयात 96.05 % मिळवून प्रथम...........
नवापूर- सत्यप्रकाश न्युज
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील विद्यार्थीनी कु.काजल नारायण मराठे हिने एम.एस्सी गणित विषयात द्वितीय वर्षात 96.05% [1921/2000] गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
कु.काजल हिस महाविद्यालयातील. प्रा.डाॅ.नलिनी पाटील, श्री रोहन गायकवाडसर डाॕ.वंदना भामरे, श्रीमती वैशाली पाटील, श्रीमती प्रिती पाटील.श्रीमती अंकिता साळी व प्राचार्य श्री पी.आर.शिरोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
कु.काजल नवापूर येथील श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक नारायण मराठे व सौ.सीमा नारायण मराठे यांची कन्या असून तीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण याच शाळेतून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण नवापूर येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झाले तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष व उद्योजक ,माजीनगराध्यक्ष विपीनभाई चोखावाला,कार्याध्यक्षा सौ.शितलबेन वाणी,उपाध्यक्ष शिरिषभाई शहा, सचिव जितूभाई देसाई, कोषाध्यक्ष सतिषभाई शाह, सहसचिव सोएबभाई मांदा,मुख्याध्यापक मिलिंद वाघ, पर्यवेक्षक दिपक मंडलीक, अरूण थोरात वरिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक बी.पी.जाधव सह शिक्षक वृंद व परिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
कु.काजल हिला भविष्यात वरिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाचे अध्यापक म्हणुन कार्य करण्याचा मानस असून तीने नेट ,सेट सह स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली असून बालपणापासून नेहमीच शिक्षणात अग्रेसर असलेल्या कु.काजल मराठे हिस सत्यप्रकाश न्यूज तर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Tags:
यशवंत/गुणवंत