दि नवापूर एज्युकेशन सोसायटी,नवापूर द्वारा आयोजित तीन दिवसीय आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.....

दि नवापूर एज्युकेशन सोसायटी,नवापूर द्वारा आयोजित 
तीन दिवसीय आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न......
          नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
      नवापूर एज्युकेशन सोसायटी,नवापूर द्वारा आयोजित 
तीन दिवसीय आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.आज दिनांक 01-09-2022 रोजी दि एन डी एन्ड एम वाय सार्वजनिक गुजराती हायस्कूल नवापूरच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री.अनिल वळवी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रस्तावनेनंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शीतलबेन वाणी(कार्याध्यक्षा,दि नवापूर एज्युकेशन सोसायटी नवापूर) यांचे स्वागत प्राचार्य श्री संजयकुमार जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.श्री.डॉ. विजयभाई आधार पाटील (निवृत्त क्रीडा प्राध्यापक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर)यांचे स्वागत  श्रीमती शीतलबेन वाणी यांनी पुष्पगुच्छ व शाल देवून केले.तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिरीषभाई शाह व संचालक श्री रजनीभाई मिस्तरी,श्री कृष्णकांतभाई दलाल यांचे स्वागत पुष्प देवून केले व मान्यवरांचे शब्द सुमनानी स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचा मुख्य भाग बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर बुद्धीबळ स्पर्धेत एकूण 120 विद्यार्थी व विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुणे प्रा.श्री.डॉ. विजयभाई आधार पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्रेरणादायी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.श्री शिरीषभाई शाह यांनीही आपल्या मनोगतातून सहभागी विद्यार्थ्याचे कौतुक केले.अध्यक्षीय भाषणात श्रीमती शीतलबेन वाणी यांनी स्पर्धेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.कार्यक्रमात सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्पर्धक विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.महेंद्र अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अशोक चौधरी यांनी केले. तर म्युझिक सिस्टीम चे कार्य श्री. जे.व्ही.जगताप यांनी पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवापूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ व सर्व शालेय पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.शब्दांकन - श्री.गुफरान मनियार

Post a Comment

Previous Post Next Post