श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल मध्ये हिंदी दिन निमित्त काव्यसंमेलन....

      श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल मध्ये हिंदी दिन निमित्त काव्यसंमेलन....       
        नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
   सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये हिंदी दिना निमित्त काव्यसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. हिंदी दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक डी ए मंडलिक होते. कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख वक्ता व कवी म्हणून डॉक्टर अपूर्व शहा, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक ए बी थोरात व ज्येष्ठ शिक्षिका मेघा पाटील मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख वक्ते डॉ. अपूर्व शहा यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित झाले. 
                   हिंदी दिनाच्या कार्यक्रमांमध्ये 16 विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. यात निसर्ग काव्य, हास्य काव्य, देशभक्तीपर काव्य, विडंबनात्मक काव्य आदींचा समावेश होता. तर दोन शिक्षकांनी हि आपल्या कविता सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. 
          कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख वक्ते अपूर्वशहा यांनी हिंदी भाषेचा इतिहास, काव्य व विध्यार्थी जीवन या विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वलिखित कविता विद्यार्थ्यांना ऐकवुन काव्यसंमेलन बहारदार केले.
 सहभागी विद्यार्थ्यांना अमोल दिवटे सरांकडून पेन भेट म्हणून देण्यात आले.
                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल दिवटे, प्रास्ताविक दर्शन अग्रवाल आभार प्रदर्शन महेंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post