आदिवासी वस्तीगृहातील 75 मुलींना कराटेचे प्रशिक्षण देऊन साजरा केला कन्या दिन.......

आदिवासी वस्तीगृहातील 75 मुलींना कराटेचे प्रशिक्षण देऊन साजरा केला कन्या दिन.......
नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
     येथील शासकिय आदिवासी मुलीचे वसतिगृह नवापूर (जूने) रंगावली ता. नवापूर जि.नंदूरबार येथे गृहपाल
श्रीमती एस .एस. पाटील यांनी आज कन्या दिनाच्या निमित्ताने येथील नव्या प्रशस्त इमारतीतील इयत्ता आठवी ते बारावीच्या एकूण 75 विद्यार्थ्यीनिना नवापूर येथील कराटे प्रशिक्षिका श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांना बोलावून कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले त्याप्रसंगी श्रीमती ज्योती चौधरी मॅडम व सोबत आलेल्या दोन विद्यार्थिनी तनवी खेडकर व प्रांजल पाटील त्यांच्या देखील सत्कार करण्यात आला कर्मचारी वृंद उपस्थित होते
श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांनी आज कन्या दिनानिमित्ताने मुलींना शुभेच्छा दिल्या व त्यांना प्रोत्साहन केले त्यात त्या म्हटल्या की मुलींवर होणारा अत्याचार व मुलींचे गर्भपात ते कुठेतरी थांबायला हवे त्या म्हटल्या कि सर्वांना तर आई हवी असते बहीण हवी असते मैत्रिणी ही हवी असते मग मुलगी का नाही मुलगीच जर जन्माला येणार नाही तर आई-बहीण मैत्रीण कुठून मिळेल
मुलगी ही नारीशक्ती आहे ती कुठेही कमी नाही जर तुम्ही मुली अशाच घाबरून जगत राहिल्या तर तुम्ही आयुष्यात पुढे कधीही जाऊ शकणार नाही तुम्ही कितीही उच्च पद मिळवले तरीही तुमच्या भीतीमुळे ते अपूर्ण आहे त्यासाठी तुम्ही मनातली आधी भीती काढा जर कोणी तुमच्या जवळ दोन मिनिटं ही वाईट नजरेने पाहत असेल तर तुम्ही त्याच वेळेस बोलायला शिका त्याला जवाब विचारा की तू का माझ्याकडे बघत आहे एवढ्या मोठ्याने विचारा की शेजार पाजारचे दहा लोकही तुमच्याकडे पाहतील काहीतरी झालं असेल त्याच्यातले नऊ लोकही तुम्हाला घाबरून राहतील का नाही ही मुलगी काहीतरी करू शकते त्यातच तुमची सुरक्षा आहे नाहीतर त्यावेळेस तुम्ही बोलले नाही तो उद्या उठून मोठी काहीतरी घटना होऊ शकते आणि त्यात तुम्ही बळी जाऊ शकता ही आपली ही जबाबदारी आहे की आपण स्वतःचे रक्षण स्वतःच करायला हवे प्रशासन पोलीस हे किती दिवस आपल्या मागे फिरतील आणि आपले केसेस घेऊन बसतील त्यासाठी गुन्हे कमी होण्यासाठी आपण मुलींनीही पुढे येऊन स्वतःचे रक्षण करण्याचे शिकायला हवे व आजच्या काळाची गरज आहे ही नारीशक्ती आहे मुलींमध्ये व स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त ताकत असते पण ती घाबरल्यामुळे या शक्तीचा वापर करत नाही त्यासाठी आधी तुम्ही मुली मनातून भीती काढा आणि जगायचं शिका कारण हे जग आपले आहे आपल्याला स्वातंत्र्य दिलेला आहे आपल्याला देवाने दोन हात पाय डोळे सर्व काही चांगलं दिलेलं आहे त्याचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करा आणि आई-वडिलांचे नाव मोठं करा वसतिगृह मध्ये तुम्हाला आज इथे कराटेच प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे त्या संधीच्या तुम्ही सोनं करा तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला हे प्रशिक्षण इथे मिळत आहे आज पर्यंत आपल्या नवापूर तालुक्यामध्ये कराटे म्हणजे काय हे कोणालाही माहिती नव्हतं पण नशिबाने मी कुठेतरी प्रशिक्षण घेतले आणि हे तुम्हाला देत आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊन सक्षम व्हा हीच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि आज आदिवासी मुली ह्या आपल्या कुठेही कमी नाही .
त्यांच्यासाठी मी दर रविवारी वेळात वेळ काढून येऊन तुम्हाला फ्री मध्ये प्रशिक्षण देणार आहे हे माझ्याकडं मी आज कन्या दिनानिमित्ताने तुम्हाला वचन देते आणि तुम्ही मला असेच प्रोत्साहन करत रहा म्हणजे भविष्यात कुठे तुमच्यावर अन्यायाची वेळ येणार नाही असे सक्षम व्हा आपल्या नवापूर शहर परिसरातील किंवा तालुक्यामधील आणखी काही इच्छुक मुली असतील त्यांना आपल्या क्लासमध्ये येण्याची इच्छा असेल त्यांनाही मी आव्हान करते की दर रविवारी सकाळी 9 (नऊ) वाजेला शासकीय मुलींचे वस्तीगृह श्री राम मंदिर समोर नवापूर येवुन प्रशिक्षण घेऊ शकता असे आव्हान श्रीमती ज्योती चौधरी यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post