शिक्षक-पदवीधरांच्या नेत्या शुभांगी ताई पाटील यांचा भा ज पा त प्रवेश.....

शिक्षक-पदवीधरांच्या नेत्या शुभांगी ताई पाटील यांचा भा.ज.पा.त प्रवेश
       धुळे सत्यप्रकाश न्यूज 
       मागील गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नां साठी सतत लढणाऱ्या व शिक्षक पदवीधरांना न्याय मिळवून देणाऱ्या लढवय्या शिक्षक नेत्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष सौ शुभांगी ताई पाटील सुर्यवंशी यांनी काल दि 21रोजी भा ज प पक्षात प्रवेश केला.
      धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप जी अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष  नारायण भाऊसाहेब, धुळे जिल्ह्याचे लाडके खासदार डॉ सुभाष भामरे, माजी मंत्री युवा नेते मा जयकुमार भाऊ रावल, प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ चौधरी, महिला आघाडी च्या अध्यक्ष जयश्री ताई अहिरराव, महापौर प्रदीप कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा गिरीशजी महाजन साहेब यांच्या मंत्रालयातील दालनात मा गिरीश महाजन साहेब यांचे आशिर्वाद घेत पक्ष प्रवेश केला व त्या नंतर भा ज प प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष मा चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच महिला आघाडी च्या प्रदेश उपाध्यक्ष मा चित्राताई वाघ यांच्या हस्ते , व भा ज प च्या नाशिक च्या  नेत्या आ देवयानी ताई फरांदे,आ सिमा ताई हिरे, भा ज प चे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मा विजय जी चौधरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती आपल्या कार्यकर्त्यां सोबतपक्ष प्रवेश केला.चौकट पदविधारांच्या व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजपात प्रवेश...... शुभांगी ताई पाटील
मी गेल्या आठ ते दहा वर्षापासून राज्यातील विनाअनुदानित शाळांवरील तसेच अघोषित शाळा, अंशतः अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा यांच्या शिक्षकांसाठी पदवीधरांसाठी व ग्रंथपालांसाठी सतत काम करीत होते ज्यामध्ये आंदोलन ,उपोषण, पायी दिंडी ,अन्नजलत्याग ,इत्यादी आंदोलने करून आंदोलनाच्या माध्यमातून 55 हजार शिक्षकांच्या पोटाचा प्रश्न सोडवून विनावेतन शिक्षकांना न्याय मिळवून दिला. हे करत असताना भाजपा सरकारने वेळोवेळी न्याय दिला आहे 20 टक्के 40 टक्के अनुदान हे तत्कालीन भाजप सरकारनेच दिले होते व यापुढेही भारतीय जनता पार्टीच आम्हाला न्याय देईल या अपेक्षेने मी भाजपात प्रवेश केला असून माझा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच केंद्र व राज्य कार्यकारणीच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मी यापुढे ही शिक्षकांचे व पदवीधरांचे प्रश्न सोडवणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post