दोंडाईचा सत्यप्रकाश न्यूज
येथील सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा.प्रकाश भांडारकर यांच्या "प्रारब्ध "ह्या आत्मचरित्राचे प्रकाशन डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते पार पडले. प्रा.प्रकाश भांडारकर यांनी आपला संपूर्ण जीवनपट चढ-उतारांसकट उलगडून एका वेगळ्या लिखाण शैलीचा प्रत्यय दिला आहे.आयुष्याच्या ज्या ज्या वळणांवर त्यांना ज्यांनी महत्वपूर्ण मदत केली त्यांच्यात त्यांनी देव पाहिला*
डॉक्टर नानासाहेब देशमुखांनी भगवतगीतेचा आधार घेऊन प्रारब्ध ही संकल्पना स्पष्ट केली. आपले प्रारब्ध आपणच घडवतो. तसेच प्रत्येकाचे जीवन ही एक स्वतंत्र कादंबरी असते असे प्रतिपादन केले.
सदर प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून प्रा.दत्ता वाघ उपस्थित होते. भांडारकर सरांचे माजी विद्यार्थी, वकील बंधुद्वय अॅड.प्रमोद पाटील व अॅड. विश्वास पाटील आवर्जुन उपस्थित होते. त्यांनी पुणेरी पगडी, शाल व मानपत्र देऊन सरांचा सत्कार केला. हस्ती पब्लिक स्कूल चे चेअरमन कैलास जैन, प्रा.नंदकुमार भावसार, अॅड. प्रमोद पाटील, पुरूषोत्तम भाई (शहादा),अनिल भाई शहा (अमळनेर)यांनी मनोगत व्यक्त केले.
Tags:
वैयक्तिक