नवापूर सत्यप्रकाश न्युज
सुप्रसिद्ध कथाकार विश्वविख्यात अध्यात्मिक संत प.पू.प्रदीपकुमार मिश्रा महाराज यांनी आपल्या सिंहोर मध्यप्रदेश येथील खा.डाॅ.अशोक यादव यांनी आपल्या पूर्वजांचा आत्म्यास शांती मिळावी म्हणुन पितृपक्षात तर्पण शिवपूरणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिवपुराण कथा गेल्या सात दिवसांपासून प्रचंड जनसमुदाय सिहोर मध्यप्रदेश येथे परिसरातील शिवभक्तांसह, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान काहि शिवभक्तांनी जातीने उपस्थित राहून ऐकत होते तर काहि शिवभक्तांनी आस्था,या अध्यात्मिक चॅनल तर फेसबुक, युट्यूब वर करोडो शिवभक्तांनी या कथेचे रसपान करून कथा ग्रहन केली.
महाराजांनी सांगितल्या प्रमाणे पितृपक्षात पंधरा दिवस आपले पूर्वज भूतलावर येऊन आपपल्या परिवाराकडे असलेल्या तिथीनुसार घास ग्रहण करतात तर शेवट अमावस्येचा दिवशी त्यांचा परतीचा प्रवास असतो हा परतीचा प्रवास अतिशय दुःखद व खडसर, अंधकारमय असतो हे गरूड पुराणात देखील ऐकून आहोत तो प्रवास अंधकारमय न होण्यासाठ कथाश्रवण करते वेळि दोन दाणे तांदूळ आपल्या जवळ ठेवून कथा संपल्यानंतर ते तांदुळ चिमण्यांना खाऊ घालावेत तर शेवटचा दिवशी आपल्या गावातील व परिसरातील नदी,तलाव,समुद्रा किनारी एक दिवा लावून आपल्या पूर्वजाचा परतीचा प्रवास प्रकाशमय करा जर या वस्तू दूर असतील तर आपल्याच घरात असलेल्या माठात माठाजवळ दिवा लावण्याचे आवाहन महाराजांनी केल्याप्रमाणे आज नवापूर शहरातील रंगावली नदी किनार्यावर मग तो महादेव मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसरासह नदी किनार्यावर जाऊन असंख्य शिवभक्तांनी दिवा लावून पितृपक्षात पृथ्वीवर आलेल्या पूर्वजांना दिवा लावून उजेडात स्वर्गात पाठवले जेणेकरून त्यांचा या स्वर्गाचा प्रवास उजेडात होईल.
सब समस्याओका हल मेरे भोले को एक लोटा जल म्हणणारे प.पू.प्रदीप मिश्रा यांनी पशुपतीनाथ कथा करतांना फक्त तीन महिने भोलेनाथ ला जल चढविण्याचे आवाहन काहि दिवसांपूर्वी केले होते त्याचे फलित आज दिसत असून अनेक शिवमंदिरात शिवभक्तांच्या रांगा दिसत आहेत व कित्येकांना त्याचा लाभ देखील तेवढ्याच मोठ्य प्रमाणात झाल्याचा अनुभव शिवभक्ता सांगत आहेत.
Tags:
धार्मिक