राष्ट्रीय सेवा योजना एक प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविणारे संस्कार केंद्र : संचालक - डॉ सचिन नांद्रे ........ नवापूर सत्यप्रकाश न्यूज
येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 24सप्टेबर रा से. यो स्थापना दिवस साजरा करण्यात आला...
या दिवसाचे औचित्य साधुन मा. डॉ. सचिन नांद्रे, संचालक, रा से यो, कबचौ ऊ म वि जळगाव यांच्या हस्ते महाविद्यालयातील एककाचे उद्घाटन संपन्न झाले..
आपल्या उद्घाटनपर भाषणात संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी रा से यो म्हणजे एक संस्कार केंद्र असून एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यांचा प्रभाव असला तरी एक प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना भरीव कामगिरी करत असते असे नमूद केले.विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शिबिरांमध्ये विद्यार्थ्यानी उपस्थित राहावे असे आवाहन करताना केवळ गुणलाभ मिळण्यासाठी नव्हे तर या माध्यमातून जात धर्म बाजूला ठेवून माणुसकीचा झरा निर्माण करा आणि खरी देशभक्ती दाखवा असे आवाहन केले. या प्रसंगी नंदुरबार जिल्हा समन्वयक मा. विजय पाटील यांनी रा से यो स्थापना दिनाच्या शुभेच्छा देवून स्वयंसेवकांच्या उपस्थिती बाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यानी रा से योच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करावा असे आवाहन केले..
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उप प्राचार्या डॉ मंदा गावित यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात राखी, प्रेरणा, सोनल आणि धनश्री या विद्यार्थिनींनी गायलेल्या एन एस एस गीताने झाली.
प्रास्तविक व परिचय रा से यों कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेखा बनसोडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एकनाथ गेडाम यांनी केले..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ ए. जी. जयस्वाल उप प्राचार्य वाय. जी. भदाने यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक