ठाणे सत्यप्रकाश न्युज
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्याने नव्याने सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक ,आयटीआय, इंजिनिअरिंग कॉलेज, डिग्री कॉलेज ,मेडिकल कॉलेज मधील शिक्षकांची मतदार नोंदणी करायची आहे.*
*सदरची नोंदणी करताना फॉर्मवर शिक्षकांचा पाठीमागे सफेद पडदा असलेला रंगीत फोटो लावायचा आहे अशी अट आहे, नाव नोंदणी करताना या अटीमुळे अनेक शिक्षक नाराजी दाखवू लागले आहेत. त्यामुळे शिक्षक मतदार संघात नोंदणी करताना अनेक शिक्षक पुढाकार घेणार नाहीत , मतदार नोंदणी करताना, फोटोच्या पाठीमागील पांढऱ्या रंगाच्या पडद्याच्या अनेक जण फॉर्म नोंदणी करणार नाहीत अशी चिंतेची बाब लक्षात येत आहे म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी कोकण विभाग आयुक्त यांना निवेदन दिले आहे , तसेच उपयुक्त श्री रानडे साहेब यांच्याशी फोनवर संपर्क साधून सदर अडचण लक्षात आणून दिली आहे. व मतदार नोंदणी मधील चिटकवायच्या फोटोच्या पांढऱ्या रंगाच्या पडद्याची अट रद्द करण्याची विनंती केली आहे अशी माहिती संपर्क प्रमुख विष्णू विशे यांनी कळविले आहे.
Tags:
राजकीय