नंदुरबार पोलीसांचे आवाहन लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा खोटी...... नंदूरबार सत्यप्रकाश न्युज
-मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात लहान मुलांना पळविणारी किंवा अपहरण करणारी टोळी बाबत काही जुने किंवा इतरत्र घडलेल्या घटनांचे व्हिडीओ, मॅसेज, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवर प्रसारीत करुन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. याशिवाय समाज माध्यमांवर काही विद्यार्थ्यांचे फोटो, व्हिडीओ प्रसारीत केले जात आहेत, त्यात त्यांना शाळेतून पळवून, अपहरण करून नेले आहे अशा अफवा पसरविल्या जात होत्या. तसेच याबाबत नागरिकांकडून नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला तसेच नियंत्रण कक्ष येथे देखील माहिती विचारली जात होती. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने सायबर सेलला याबाबत शहानिशा करण्याचे आदेश दिले. नंदुरबार जिल्ह्यातील सायबर सेलकडून समाज माध्यमांवर प्रसारीत होत असलेल्या व्हिडीओची व मॅसेजची शहानिशा व सखोल चौकशी केली असता सदरचे व्हिडीओ व मॅसेजेस हे तथ्यहीन व खोटे असल्याची खात्री झाली आहे.नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांचे आदेशाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वशाळा, महाविद्यालय परिसरात पोलीसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे सर्व शाळा महाविद्यालयात जावून जनजागृती करतील असे देखील आदेश दिलेले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आपले अल्पवयीन पाल्य शाळा, शिकवणी किंवा इतर कुठेही एकटे पाठवू नका, त्यांना सदर ठिकाणी सोडणा-या ऑटो, बस व्हॅन यांचे चालकांची संपूर्ण माहिती फोटोसह आपल्याकडे ठेवावी. आपल्या पाल्यांना ते जबाबदारीने संबंधित ठिकाणीच व्यवस्थित सोडत असल्याची वारंवार खात्री करावी. घर गल्ली, परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाणेस त्वरित कळवावे. गावात किंवा आपल्या परिसरात येणारे अनोळखी व्यक्ती व इतर फेरीवाले यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे की, नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेलद्वारे जिल्ह्यातील सोशल मिडीयाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नंदुरबार जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सतर्क असून लहान मुलांना पळविणारी टोळी बाबत समाज माध्यमांवर प्रसारीत झालेले व्हिडीओ मॅसेजचा नंदुरबार जिल्ह्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे नागरीकांनी असे अफवा पसरविणारे व भिती निर्माण करणारे किडीओ विनाकारण व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांवर प्रसारित करून नागरीकांमध्ये भितोचे व दहशतीचे वातावरण निर्माण करु नये. जर कोणी जाणीपूर्वक अशा अफवा पसरवत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार 02564 210113 या दुरध्वनीवर किंवा हेल्पलाईन नंबर डायल 112 वर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहनकरण्यातयेतआहे.

Tags:
शासकीय