नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे खोडाई माता यात्रौत्सवाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचे उद्घाटन....... नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
दिनांक 26/09/2022 ते दिनांक 05/10/2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवच्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर येथे Pratत्सव आयोजित करण्यात येत असतो. यात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिरामध्ये भाविक विशेषतः ariवृद्ध व्यक्ती, स्त्रिया, पुरुष, लहान मुले / मुली इत्यादी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. यात्रोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज दिनांक 26/09/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी दिनांक 26/09/2022 ते दिनांक 05/10/2022 रोजी दरम्यान भाविकांच्या मदतीसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तात्पुरत्या स्वरुपातील सुसज्ज अशा पोलीस चौकीचे उद्घाटन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अमलदार सविता तडवी यांचे हस्ते करण्यात आले.
मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व यात्रौत्सवात येणारे वयोवृद् व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींची गैरसोय टाळण्याकरीता तसेच त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, याकरिता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप व खुच्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरुन वयोवृद्ध व्यक्ती व दिव्यांग व्यक्ती अल्प विश्रामासाठी थांबतील व त्यांना दर्शनाचा तसेच यात्रोत्सवाचा आनंद घेणे शक्य होईल.
संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील भाविक खोडाई माता मंदिरात मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. सवांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची बाटली घेणे शक्य होत नाही. अशा सर्व भाविकांसाठी स्वच्छ पाण्याची सोय व्हावी व त्यांना निःशुल्क पाणी उपलब्ध व्हावे, याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे स्वच्छ व निःशुल्क पाणपोईची सोय भाविकांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
मंदिर व यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होवू नये, याकरिता चोरांपासून सावधान राहा, मौल्यवान दागिने सांभाळून ठेवा, प्रसार माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या खोट्या arrar / अफवा यांचेवर विश्वास ठेवू नये. तसेच इतर आशयाचे बॅनर्स देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे मंदिर व यात्रा परिसरात लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही.