गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दुसऱ्या दिवशीही दणका..........

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दुसऱ्या दिवशीही दणका....
नंदुरबार सत्यप्रकाश न्युज 
    दिनांक 26/09/2022 ते दिनांक 05/10/2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरोत्सवाच्या अनुषंगाने मंदिर व यात्रोत्सव दरम्यान गदांच्या format for महिलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर gasingन होत असतात त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नंदुरबार जिल्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांचे एक दामिनी पथक तयार करून टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
   त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे- 17, उपनगर पोलीस ठाणे- 05, varपूर पोere are 10, शहादा पोलीस ठाणे-08, धडगांव पोलीस ठाणे 02, सावद पोलीस ठाणे-102, सारंगखेडा पोलीस ठाणे- 102. अक्कलकुवा पोलीस ठाणे-05. मोलगी पोलीस ठाणे-112 एकुण 53 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दिनांक 26/09/2022 रोजी देखील 21 मुलीची छेडछाड करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात आली होती.
   तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, तसंच पुन्हा त्या युवकांनी तिसन्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्याचेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
      नवरात्रोत्सवा दरम्यान जिल्हयातील वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले जात असून त्या ठिकाणी असणान्या टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे. स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून अशा टवाळखोर goatfare कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत, सदरची मोहिम नवरात्रौत्सवा दरम्यान अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
     त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून त्यांना परावृत्त करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरवार श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व पालकांना केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post