व्यापाऱ्याची लुटमार करणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज
श्री. दिलीपभाई रशिदभाई नाईक वय- 40 धंदा- कुरीअर रा. कृष्णा विहार नळवा रोड नंदुरबार हे दिनांक 29/08/2022 रोजी सायंकाळी 07.00 ते 08.00 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील तुप बाजार परीसर येथील त्यांचे ऑफिस मधील दैनंदिन व्यवहाराचे एकुण 95000/- रुपये रक्कम ऑफीस बंद करुन त्यांचे मुलाच्या शाळेच्या बॅगेत ठेवून त्यांचेसह मोटार सायकलीने घराकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळेस उपनगरातील कृष्णा नगर येथील राजेंद्र पाटील यांचे श्रीपाद नावाच्या बंगल्यासमोर एक बिना नंबरच्या मोटार सायकलवरील 3 अनोळखी इसमांनी श्री. दिलीपभाई नाईक मोटार सायकलीच्या पुढे त्यांची मोटार सायकल आडवी लावून श्री. दिलीपभाई नाईक यांचे डोळयात मिरची पुड भिरकावून श्री. दिलीपभाई नाईक व त्यांचा मुलगा याची शाळेची बॅग व त्यातील 95,000/- रुपये हे जबरीने हिसकावुन पळून गेले. त्यानंतर श्री. दिलीपभाई रशिदभाई नाईक वय 40 धंदा- कुरीअर रा. कृष्णा विहार नळवा रोड नंदुरबार यांचे फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द गु.र.नं. 238/2022 भा.द.वि. कलम 392, 341, 34 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे हे घटनास्थळी रवाना झाले. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तसेच धुळे जिल्ह्यातील नंदुरबारलगत असलेल्या पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी करणेबाबत सांगितले.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर व उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलीस ठाण्याचे पथकाने फिर्यादी यांचे ऑफीस व घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी.सी.टी.व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीतांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे व दुचाकीला नंबर नसल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती.
दिनांक 27/09/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मागील महिन्यात व्यापाऱ्याचे पैसे लुटणारा हा धुळे शहरातील सराईत आरोपी नामे खुशाल उर्फ मनोज मोकळ हा असून त्याने त्याचे इतर दोन साथीदार यांचे मदतीने व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून जबरीने पैसे लुटले आहेत. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना कळवून संशयीत आरोपी खुशाल उर्फ मनोज मोकळ व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेवून माहितीची खात्री करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी त्यांचे तात्काळ एक पथक तयार करुन धुळे येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ, वय- 22 धंदा- पान टपरी, रा. घर नं. 27, दंडेवाला बाबा नगर, मोहाडी, धुळे यास धुळे येथील बस स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणून गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता खुशाल उर्फ मनोज मोकळ याचा धुळे येथील मित्र शंकर रेड्डी व त्याचा मेहूणा योगेश रा. सुरत याने नंदुरबार येथील ऑफिसची माहिती पुरविल्याने त्याने त्याचे इतर दोन साथीदार नामे 1) मुझाहिद खाटीक, 2) सलीम यांच्या मदतीने दि. 29/08/2022 रोजी तुप बाजार, तांबोळी गल्ली, नंदुरबार येथील एका इसमाचा पाठलाग करुन एका कॉलनीत सदर इसमाच्या मोटार सायकल समोर गाडी आडवी लावून त्याच्या डोळ्यात मिरचीपुड टाकुन त्याचेकडील पैश्यांची असलेली बॅग पळवून नेली बाबत आरोपी खुशाल उर्फ मनोज मोकळ याने सविस्तर सांगितली.
खुशाल उर्फ मनोज मोकळ याचे मुस्लीम कब्रस्तान जवळ, धुळे व खुशाल मोकळ यास माहिती देणारे त्याचे दोन मित्र शंकर रेडडी रा. मिल परीसर, धुळे व त्याचा मेहुणा योगेश रा. सुरत यांचा शोध घेणेसाठी पथके तयार करुन सुरत व धुळे येथे रवाना करण्यात आले असून लवकरच त्यांना देखील बेड्या ठोकण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.
खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ, वय- 22 धंदा- पान टपरी, रा. घर नं. 27. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी, धुळे याचेवर यापूर्वी धुळे, जळगांव, नाशिक येथे जबरी चोरीचे 17 गुन्हे दाखल असून त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे. तसेच खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ व त्याच्या साथीदारांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत.
सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस नाईक राकेश मोरे, सुनिल पाडवी, मोहन ढमढेरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत, आनंदा मराठे, विजय द्विवरे यांच्या पथकाने केली आहे.
Tags:
शासकीय