तब्बल दोन वर्षांनंतर रंगतोय नवापूरात गरबा-दांडिया........

 तब्बल दोन वर्षांनंतर रंगतोय नवापूरात गरबा-दांडिया.......         आशापूरी माता,नवापूर 
       नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    दोन राज्याच्या सीमेवरील व राष्ट्रीय महामार्गावर असलेले नवापूर शहर जिथे दोन्हि राज्याची सण उत्सव अत्यंत आनंद व उत्साहात साजरा केली जातात जसा गणेशोत्सवात गणेशाचे देखावे,व लेझीम नृत्य देखनीय व उल्लेखनीय असते तसेच नवरात्रोत्सवाचे गरबा दांडिया नृत्य देखनीय व प्रशंसनीय असते मग दोन टाळी, तीन,टाळि, दांडिया ,ढोडिया हे प्रकार अत्यंत उल्लेखनीय आहेत. 
     शहरात दत्त मंदिरा जवळ या नवरात्रोत्सवाचा गरब्याला सुरुवात झाली त्यांनंतर आशापूरी
  माता मंदिर, कुंभार वाडा,सरदार चौक,नेहरूनगर, जुनी पोस्ट गल्ली,शास्त्रीनगर, लिमडावाडी,नवभारत सोसायटी,मंगलदास पार्क, जनतापार्क, तीनटेंभा ,भगत वाडी, टर्नर प्लाट मधील नवरत्न कलाकार गरबा मंडळा सह रेल्वेस्टेशन व उच्छल मधील गरबा होत होते व गरबा प्रेमी आपली हजेरी लावत होते.
       या गायकांनी रंगवला गरबा           शहरात सुरूवातीला लाऊडस्पीकर वर हेमंत पुराणिक, ईश्वरभाई प्रजापत, धनाजी प्रजापत, अंबूभाई,  हेमंत शाह , धर्मेश परदेशीी,  अनंत पाटील,  श्याम गावित तर महिलाांमध्ये सौ.स्नेहलताबेेन शाह,सौ करूणाबेन घीवाला,सौ.कश्मिराबेन शाह,   नारायण मराठे ,कृष्णा मराठे,तेजेंद्र सोनार, बालम लोहार, महेंद्र चव्हाण, प्रकाश खैरनार, रमेश अग्रवाल,     स्व.गणेश मराठे  तर स्व.शांतूभाई  दवे ,दिपक सोलंकी,नरेेश सोलंंकी, याांची ढोलकी तर आनंद वशिष्ठ चा तबला श्री हरिश्चंद्र पाटिल ,शििवाभाई ॠषी,रवी ऋषी,विजय  ॠषी, चा तालावर 
अनेक गरबा प्रेमींनी ठेका घेतला.
     देवीची मंदिरे
      शहरात आशापूरी माता,सप्तशृंगी माता, अंबे माता, आदिंची मंदिरे असून येथे नवरात्रोत्सवात भाविक आपली हजेरी लावत असतात. 
     गेल्या दोन वर्षांपासून कोरोना च्या थैमान घालत असल्याने नवरात्रोत्सवात शांततेचे वातावरण होते पण या वर्षी तेवढ्याच उत्साहात हि गरबा मंडळे पुन्हा सज्ज झाले असून गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी जोरात सुरू आहे 
   या वर्षी मंगलदास पार्क मधील मंडळाच्या दोन वर्षांनंतर गरबा होणार असून आम्ही आनंदात करू गरबाप्रेमींची साथ  आहे हा उत्सव आनंद व उत्साहाचे प्रतीक आहे आपली परंपरा आहे ,संस्कृती आहे ती राबवली पाहिजे यासाठी सर्व सहकार्य करीत असतात, दहा दिवस कसे निघतात समजत नाही अंबे मातेचा फोटो समोर आम्ही गरब्याचा ठेका घेतो सोबत संगीत खुर्ची,56 भोग ,व महिलासाठि कार्यक्रमाचे नियोजन असून हा उत्सव भक्तिमार्गाने साजरा करणार आहोत.
              सौ. सुनंदाताई मधुकर पाटील 
     अध्यक्षा - जनता पार्क गरबा मंडळ.
       गेल्या दोन वर्षांपासून कोरोना चा प्रादुर्भाव व शासनाचे निर्बधामुळे गरबा प्रेमी नियमात बांधले गेले होते या वर्षी मात्र निर्बंध मुक्त झाल्यामुुळे  पुन्हा तोच उत्साह
निर्माण झाला आहे या वर्षी इतर कार्यक्रमाचे आयोजन न करता फक्त रास गरबा रंगवायचा असून अष्टमीला नवचंडी यज्ञ करण्यात येणार आहे.
     दांडिया प्रेमींनी खूप खेळा व आपल्या आद्य दैवतचे दर्शन करून स्मरण करा.तूर्तास एवढेच  जय माता की.
                    हेमंतभाई शाह 
    आयोजक - आशापूरी नवरात्र मंडळ
      मी बालपणापासून सरदार चौक गरबामंडळात रास गरबा खेळत असून आम्ही      सर्व मित्र परिवार अत्यंत  व उत्साहात खेळत होतो पण दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट व काहि परिवाराचे सदस्य गेल्याचे दुुः ख असून या वर्षी देवी मातेने आपली कृृपादृष्टि  ठेवली असून पुन्हा त्याच उत्साहात यावर्षी गरबा खेेळणार असून माता सर्वाचे कल्याण करो हिच प्रार्थना.
                सौ.जास्मिन पटेल 
    अध्यक्षा - सरदार चौक गरबा मंडळ

Post a Comment

Previous Post Next Post