नवापूर येथील घरफोडीचा गुन्ह्यात 1 लाख 41 हजार 700 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 2 आरोपी नवापूर पोलीसांच्या ताब्यात.....

नवापूर येथील घरफोडीचा गुन्ह्यात 1 लाख 41 हजार 700 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 2 आरोपी नवापूर पोलीसांच्या ताब्यात.....
    नंदुरबार सत्यप्रकाश न्युज 
     मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत चोरी, घरफोडी चे गुन्हे दाखल असून ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते. त्याअनुषंगाने गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले.
  दिनांक 24/09/2022 रोजी रात्री 09/00 श्री. खलफान रहेमान शेख हे त्यांच्या मालकीचे नवापूर शहरातील लिलावती मॉलजवळ असलेले गोडावून कुलूप लावून घरी गेले होते. दिनांक 25/09/2022 रोजी सकाळी 09/00 वाजता ते नेहमीप्रमाणे त्यांच्या गोडावूनमध्ये गेले असता गोडावूनचे सिमेंटचे पत्रे तुटलेले दिसले व गोडावूनमधील । A. C. 7 सिलिंग फॅन, । टेबल फॅन व पॉवर मशिन असा एकुण 41,760/- रुपये किमतीचा मुद्देमाल गोडावूनमध्ये नसल्याचे त्यांचे लक्षात आले, म्हणून श्री. खलफान रहेमान शेख वय-38 रा. मुसलमान मोहल्ला, नवापूर जि. नंदुरबार यांचे फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे येथे 484/2022 भा.द.वि. कलम 457,380,34 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश वाघ यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
    नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश वाघ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नयाहोंडा परीसरात, लकी बियरबार जवळ करंजी रोड लगत एका घराच्या आडोश्याला गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल नवापूर शहरातील सरदार चौक परिसरात राहणारा जुनेद काथावाला याने व त्याचे एका साथीदाराने लपवून ठेवलेला आहे त्यामुळे त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर माहिती कळवून संशयीत आरोपी जुनेद काथावाला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
   नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी सरदार चौक परिसरात साध्या वेशात जावून सापळा रचून जुनेद काथावाला यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने जुनेद फारुख काथावाला वय-32 रा. सरदार चौक नवापूर जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास श्री. खलफान शेख यांचे गोडावून चोरी झालेल्या चोरीबाबत विचारपूस केली असता सुरवातीला तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला नंतर त्यास नवापूर पोलीस ठाणे येथे आणून पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नामे सुभाष गायकवाड रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवापूर याचे मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच सुभाष दगडू गायकवाड वय-25 रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवापूर जि. नंदुरबार यास देखील ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील 41,760/- रुपये किमतीचा 1 A.C., 7 सिलिंग, 1 टेबल फॅन व | पॉवर मशिन व 1 लाख रुपये किमतीचे गुन्हा करतेवेळी वापरलेले मारुती व्हॅन वाहन असा एकुण 1,41,760/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
   नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा अवघ्या 24 तासात उघड करुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अभिनंदन केले.सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री निलेश वाघ, पोलीस हवालदार/ दादाभाई वाघ, पोलीस नाईक नितीन नाईक, पोलीस कॉन्सटेबल संदिप सोनवणे यांचे पथकाने केली आहे.

1 Comments

Previous Post Next Post