महाविद्यालयातील रा से यो चा राज्य सरकारच्या "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियानात सहभाग राज्य सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" ह्या दि.२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या अभियानामधे नवापूर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या व तृतीय वर्ष विज्ञान वर्गाच्या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय नवापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामधे विद्यार्थिनींची उंची वजन, हिमोग्लोबिन, सिबीसी, बीएमआय सह सिकल सेल अनेमियाचीही चाचणी करण्यात आली.
अभियान यशस्वी करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ शशिकांत वसावे(वैद्यकीय अधिक्षक, वर्ग १), श्री रायसिंग कुवर (समुपदेशक, राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम ) आणि श्री सुभाष गावित (समुपदेशक,असंसर्गजन्य आजार) एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राचे समुपदेशक श्री.कैलास माळी यांनी विद्यार्थिनींचे समुपदेशन केले.
उप जिल्हा रुग्णालयातील अधिसेविका सौ हेमा जाधव, इन्चार्ज शबरी गावित आणि निर्मला गावित, अर्चना बिरारी, रवींद्र पिंपळे यांच्यासह सुषमा पाडवी, अर्चना वसावे हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
वर्षांवरील महाविद्यालयीन किशोरींच्या या आरोग्य अभियानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए जी जयस्वाल उपप्राचार्य वाय जी भदाणे, यांचे मार्गदर्शन लाभले तर उपप्राचार्य डॉ मंदा गावित, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ आर डी पाटील व रा.से. यो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेखा बनसोडे, प्रा. एकनाथ गेडाम, प्रा. जगदीश वसावे, डॉ. विनायक वसईकर हे विशेष परिश्रम घेत आहेत.
Tags:
शैक्षणिक