पंचायत समिती सभापती, उपसभापती,पदाच्या निवडीसाठी 13 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन.....

पंचायत समिती सभापती, उपसभापती
पदाच्या निवडीसाठी 13 ऑक्टोंबर रोजी विशेष सभेचे आयोजन........
नंदुरबार,  (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामविकास विभागाच्या 4 ऑक्टोबर 2022 च्या अधिसूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणाचे वाटप उर्वरित कालावधीसाठी विनिर्दिष्ट केले आहे.
   त्यानुसार पंचायत समितीच्या उर्वरित कालावधीसाठी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवार 13 ऑक्टोंबर 2022 रोजी  विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेसाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार हे पिठासन अधिकारी असतील. तर गट विकास अधिकारी यांना सहायक पिठासीन अधिकारी असतील. तरी सर्व संबंधित सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post