ग्रामपंचायत निवडणूकीमुळेग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय व दुकाने आस्थापनास15 व 16 ऑक्टोंबर रोजी सुट्टी जाहीर.......

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे
ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय व दुकाने आस्थापनास
15 व 16 ऑक्टोंबर रोजी सुट्टी जाहीर
  नंदुरबार, दि. 11(जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 45, अक्राणी तालुका 25, तळोदा तालुका 55 व नवापूर तालुक्यातील 81 अशा एकूण 206 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार 16 ऑक्टोंबर, 2022 रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी शनिवार 15 ऑक्टोंबर,2022 रोजी रवाना करण्यात येणार आहे.
   त्यामुळे निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या स्थानिक संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास 15 व 16 ऑक्टोंबर,2022 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तसेच  निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने,आस्थापना,निवासी हॉटेल्स,खाद्यगृहे, व्यापार,औद्योगिक उपक्रम किवा आस्थापना मधील मतदार, कामगारांना 16 ऑक्टोंबर,2022 रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता भरपगारी सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post