मुंबई सत्यप्रकाश न्युज
काल आझाद मैदानावर सुरू असलेल्या अघोषित व अंशतः अनुदानित , त्रुटी पूर्तता शाळांचं आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे सर स्वतः त्या ठिकाणी सक्रिय सहभागी होते.
सायंकाळच्या वेळेला 4 आमदार त्या ठिकाणी आंदोलनास भेट देण्यासाठी आले होते, त्या आमदारांना विदर्भातून आलेला , आंदोलनकर्त्या शिक्षक आपली व्यथा मांडत असताना, " माझी मुलगी कॅन्सर ग्रस्तआहे, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे , माझ्या खिशात एकही रुपया नाही " साहेब आमचा पगार मिळवून द्या , अशी विनवणी ढसाढसा रडून करत होता.
वाटलं होतं , त्या शिक्षकाची व्यथा पाहून उपस्थित असलेले 4 आमदार काही तरी मदत त्या बांधवाला करतील, पण मदत तर सोडाच साधी विचारपूस सुद्धा त्या बांधवांची केली नाही, व निघून गेले.
मात्र तिथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या खिशात हात घालून त्या बांधवाला जवळ घेऊन सांत्वन केले व क्षणाचाही विलंब न करता 10 हजाराची रोख रक्कम त्याच ठिकाणी मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी दिली, आणि "काळजी करू नका सर! तुम्हाला काय अजून लागल्यास निश्चितपणे माझ्याशी संपर्क करा " असं सांगून त्यांना धीर दिला.
कोण ? कुठचा शिक्षक, म्हात्रे सरांचा, ना ओळखीचा न पालखीचा , ना त्यांच्या विभागातील मतदार, त्याचे नाव सुद्धा ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना माहिती नाही, पहा सरांचा दानशूरपणा , "माझ्या शिक्षकाची व्यथा पाहून मला खूप वाईट वाटले," अशी वेळ कोणावरही यायला नको, या बांधवाला आपण मदत केली पाहिजे, माझा शिक्षक बांधव अडचणीत आहे, म्हणून मी माझ्या शिक्षकाला तातडीने मदत केली , असा विचार करणारा🙏 ज्ञानेश्वर म्हात्रे🙏 सरांसारखा दानशूर व्यक्तिमत्व असणारा नेता शोधूनही सापडणार नाही*
*आर्थिक अडचणीत असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक शिक्षक- शिक्षकेतरां साठी एक देवदूत म्हणूनच काम करत आलेले आहेत, शेकडो शिक्षकांना त्यांनी वैद्यकीय मदत ,आर्थिक मदत केलेली आहे , कोरोना काळात अनेक शिक्षकांना संस्थेने पगार दिलेले नव्हते ,त्यांना सुद्धा खर्चाला पैसे सरांनी दिलेले आहेत.
वाईट एकाच गोष्टीचे वाटले की, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 4 आमदारांपैकी एकानेही या गरीब शिक्षकाची अडचण समजूनही घेतली नाही किंवा साधी विचारपूस सुद्धा केली नाही*
मग आता ,सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी ठरवलं पाहिजे. शिक्षकांची व्यथा समजणारा, शिक्षकांसाठी अहोरात्र मेहनत घेणारा, शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सतत लढणारा, गोरगरीब शिक्षकांना आर्थिक अडचणीमध्ये मदत करणारा दानशूर नेतृत्व असलेला, माणूस म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे सर , यांच्या पाठीशी भर भक्कमपणे आपण उभा राहिल पाहिजे, असं नेतृत्व गमावणं आपल्याला , या शिक्षक नसल्या लोकांनी लावलेल्या "पाकीट संस्कृतीमध्ये" परवडणारे नाही
जीवाचं रान करू पण म्हात्रे सरांना आपण निवडून आणू या !
शिक्षकांचा आमदार, शिक्षकच झाला पाहिजे अशी माहिती ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
Tags:
शैक्षणिक