नवापूर सत्यप्रकाश न्यूज
तालुक्यातील रेशन दुकानदार यांच्या शिष्टमंडळाने विशिष्ट समस्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांची भेट घेऊन त्यांचा नेतृत्वाखाली सर्व रेशन दुकानदारांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांची भेट घेऊन विविध समस्याचे मौखिक गहाणे मांडले.
यावेळी चर्चेत भरत गावीत म्हणाले की, तालुक्यातील सर्व दुकानदारांना युनिट प्रमाणे १०० टक्के माल मिळावा. पीएमजीकेवाय या योजनेचा गहू व तांदुळ कमी प्रमाणात मिळतो. तो वाटपचे मार्जिन हे शासनाच्या नियमाप्रमाणे दुकानदारांच्या खात्यात अजुनपर्यंत बाकी आहे ते जमा करण्यात यावे. दर महिन्याचे धान्य हे चालू महिन्याच्या १ तारखेपासून गोडावूनमधून वाटप चालू करण्यात यावे. दर महिन्याचे नियतन हे बोर्डवर लावावे. जेणे करून माल
१०० टक्के मिळावा तसेच सर्व दुकानदारांचे मोफत करुन दुकानदार तफावत काय आहे ते दुकानदार समजून घेतील. त्यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यातील वाद कमी होतील. दुकानदारांनी वाटप केलेल्या कार्डवरील धान्य हे किती वाटप व किती बाकी याचा बोर्डवर नोटीस लावावी. तसेच तक्रार असलेल्या दुकांनांची भेट देवून तपासणी करण्यात यावी, अशा विविध समस्या भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांनी तहसिलदार यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी दालनात सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते. यावेळी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल, जाकीर पठाण आदी उपस्थित होते. शिधापत्रिकाधारकांना शासनातर्फे वेळोवेळी आलेल्या नविन योजनांची माहीती देण्यासाठी तहसिल कार्यालय येथे बोर्ड लावावे. सदर बैठकीत रेशन दुकानदारांच्या समस्या मांडल्याने भरत गावित यांचे आभार मानण्यात
Tags:
राजकीय