प्रिय वाचक दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा व या निमित्ताने सत्यप्रकाश news portal आपल्या साठि घेऊन येत आहेसत्यप्रकाश चे व्यक्तिविशेष सदरात मा.प्रा.प्रकाश भांडारकर यांचा यशस्वी जीवनाचा प्रेरणादायी प्रवास........

प्रिय वाचक दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा व या निमित्ताने सत्यप्रकाश news portal आपल्या साठि घेऊन येत आहे.....   
    सत्यप्रकाश चे व्यक्तिविशेष सदरात दोंडाईचा येथील माजी समाजध्यक्ष व भांडारकर क्लासेस चे संचालक सेवानिवृत्त प्राध्यापक मा.प्रकाशजी भांडारकर यांचा सामाजिक जीवन परिचय जो आपल्या साठि प्रेरणादायी ठरेल -------
  नांव : प्रा. प्रकाश सुखलाल भांडारकर
               दोंडाईचा जि.धुळे
जन्म दिनांक: ८ / ७/१९५४
शिक्षण: - M.A.DHE (English  )
व्यवसाय-:- सेवानिवृत्त प्राध्यापक 
प्रेरणास्थान :- प्राचार्य कै.डाॅ.अ.निं.माळी,गोपालराव शिंपी.. भूषविलेली पदे :- दोंडाईचा शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष ,सल्लागार म्हणून समाजकार्य केल्यानंतर मध्यवर्ती संस्थेत पदाधिकारी होण्याची संधी मिळाली तसेच १९९३ पासून नंदादीप मासिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम पाहिले, आळंदि येथील अधिवेशनात स्मरणिकेचे संपादन केले सध्या नामविश्व या मासिकाचे सहसंपादक असून शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी संत नामदेव महाराज एज्युकेशन ट्रस्ट चे ऍडव्हायजरी बोर्ड मेंबर म्हणून  कार्यरत आहेत, हस्ती पब्लिक स्कुल, संचालक ,उपाध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघ, ज्येष्ठ मार्गदर्शक  धुळे जिल्हा शिंंपी समाज, सल्लागार दोंंडाईचा शिंंपी समाज आदि.
पुरस्कार - आदर्श शिक्षक पी. बी. बागल कालेज दौडाईचा, भारतीय पत्रकार संघ, राष्ट्रीय विकास रत्न, शिंपी समाजाकडून दिशादर्शक पुरस्कार, महाविद्यालयातर्फे आदर्श शिक्षक, समाजभूषण, कोरोना योध्दा, गुरु द्रोणाचार्य आदि सह अनेक पुरस्काराचे धनी असलेले भांडारकर सरांनी सामाजिक कार्यात आपल्याला स्वतः ला वाहून नेले आहे.
समाज कार्य करण्याचा ज्यांनी घेतला आहे ध्यास.
ते आहेत दोंडाईचा येथील भांडारकर प्रकाश 
     आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी आपले काही तरी देणे असून समाज सेवे द्वारे समाजाचा विकासाचा ध्यास मनी घेऊन १९८४ नवयुवक मंडळाची स्थापना करून युवकांना समाजकार्य साठि प्रेरित केले. तसेच
    दोंडाईचा येथे सामुदायिक विवाहचे आयोजन करून समाज बांधवाचा वेळ व पैशाची बचत केली, अधिवेशनच्या स्मरणिका पुस्तिकेचे संपादक करून अधिवेशनात झालेल्या घडामोडींचा लेखा जोखा समाजबांधवापर्यंत पोहचविला, २००९ भव्य वधु वर मेळाव्याचे आयोजन केले,  पांडुरंग शिंपी ,माजी अध्यक्ष श्री सुरेश बागुल विद्यमान अध्यक्ष श्री हरिदास जगताप यांच्या सोबत दोंडाईचा येथील शिंपी समाज बांधवांसाठी ७० X ४० चे मंगल कार्यालयाचे काम सुरू असून ५२ X४० चा हॉल तयार असून समाजाचा विविध कार्यक्रमांना उपयोगी पडत आहे.
   आपल्या जीवनातील स्वानुभव कथन आपल्या प्रारब्ध या पुस्तकात केले असून सदर पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे माजीमंत्री नानासाहेब हेमंत देशमुख यांच्या हस्ते व जेष्ठ पत्रकार दत्ता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला ,यावेळेस माजी विदयार्थानी पुणेरी पगडी देऊन विशेष सन्मान केला या उपस्थितीत श्रोते मन भारावून गेले होते.
   समाज कार्य करतांना आपले आपपसातले मतभेद विसरून सर्व समाज बांधव एकत्र आले तर समाजाचा विकास होईल व समाज पुढे जाण्यास मदत होईल म्हणून समाजकार्य करतांना हेवेदावे नकोत व मतभेद तर नकोच सर्वांनी एकजुटीने काम केले तर इतर समाजासारखे आपल्या समाज कार्यामध्ये पण वेग येईल म्हणून बदल होणे गरजेचे आहे व तो एकत्र आल्याने हमखास होईल असे मत प्रा. भांडारकर सरांनी सत्यप्रकाश न्युज ला मांडले शिक्षक या नात्याने त्यांनी युवकांना मंत्र दिला की एकत्र होऊन संघर्ष करा म्हणजे हमखास प्रगती होईल व विकास देखील अशा अनुभवी व प्रेरणादायी समाजसेवकांना जय नामदेव.










 

 

Post a Comment

Previous Post Next Post