नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज येथील तक्रारदार नाम श्री. संजय मोहनलाल जन, वय 45 वर्ष व्यवसाय मेडीकल स्टोअर्स, रा. काका हाऊस, परेदशीपुरा, नंदुरबार यांचे मालकीची 30,000/-रु.कि.ची एक TVS कंपनीची ज्युपीटर स्कूटर तिचा क्रमांक MH-39-Q-5908 असा असलेली ही 26/10/2023 रोजी सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 वा. च्या दरम्यान नंदुरबार शहरातील अंधारे चौक येथील ओम डायग्नोस्टीक अॅन्ड मेडीकल समोर रोडवर लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुरनं 839 / 2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा मोटारसायकल चोरीशी निगडीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत नंदुरबार शहर पोलीस दाणेचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांना आदेश दिला.
नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या मोटारसायकलच्या शोधासाठी 03 पथके तयार केली.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना मोटारसायकलची चोरी करणारा एक इसम हा नवापूर चौफुली परीसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी पानि निवृत्ती पवार यांना बातमीची खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशीत केले त्याअनुषंगाने पानि निवृत्ती पवार यांनी वर नमुद पोलीस पथकासह नवापूर चौफुली परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हे एका मोटारसायकलसह येत असतांना दिसून आले. पोलीस पथकाने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता परंतु संशयीत आरोपी हे मोटारसायकलसह पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यानंतर पोलीस पथकान अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले त्याचेकडे ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारपुस केली असता ते उवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यानंतर त्यांना नंदुरबार शहर पोलीस ठाण येथे आणून विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी त्याचे नावे 1) सदाम शेख अजीज मिस्तरी, वय 31 वर्ष, रा. चिराग गल्ली, नंदुरबार ह.मु. सिव्हील हॉस्पीटल जवळील घरकुल, नंदुरबार ता. जि. नंदुरबार असे असल्याचे सांगुन त्याचे सोबत आणखी एक इसम नामे 2) शहारुख शेख अनीन, वय- 28 वर्ष, रा. चिराग गल्ली नंदुरबार ता. जि. नंदुरबार असा असल्याचे सांगुन त्यांनी दोघांनी नंदुरबार शहर येथून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्यांचेकडे 30,000/- रु. कि.ची एक TVS कंपनीची ज्युपीटर स्कुटर तिचा क्रमांक MH-39-Q-5908 असा असलेली ही मिळाली असून त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुरन 839/2023 भादवि कलम 379 प्रमाणे दिनांक 28/10/2023 रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले सदरची मोटारसायकल ही कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केली तसेच त्यांचकडे अधिक विचारपुस करता त्यांनी आणखीन 09 मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. सदरच्या मोटारसायकली देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या त्याचं वर्णन खालीलप्रमाणे
1)180,000/- रूपये किमतीची एक TVS कंपनीची जुपीटर स्कुटर पांढऱ्या रंगाची तिचा क्रमांक MH-39 AM-4666 तिचा
चेसिस नंबर MD626AK48P1K01395 व इंजिन नंबर BKAKPTX00009 असा असलेली जु वा. कि. अ. (नंदुरबार बाहर पोलीस ठाणे गु. र. न. 838 / 2023 भा. द. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल
2)30,000/- रुपये किमतीची CB हॉनेट 160R काळ्या रंगाची तिचेवर केसरी पट्टा गाडी क्रमाक MH-18-BK0964 तिचा चेचीस नंबर ME4KC39KH8049870 व इंजिन नंबर KC23684096487 असा असलेली जु. वा. किं. अ. (नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु. र. न. 841/2023 भा. द. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल
3) 30,000/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची सुपर स्पेल्डर मोटार सायकल क्रं. MH39 Q-1801 तिचा चेचीस नं. MBLIA0SEMG921850 इंजिन नंबर JA0SECG9A31819 असा असलेली जु वा. कि. अ.(नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.न. 24 / 2023 भा. द. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल)
4) 25,000/- रुपये किंमतीची डिसकव्हर मोटार सायकल क्रमाक GI-21-AB-5034 तिचा चेचींस नंबर MDRDSPAZZTPF61850 व इंजिन नंबर JBUBTF99791 असा असलेली जु वा किं. अ. (नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु. र. न. 840/2023 भा. द. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल 5) 35,000/- रुपये किंमतीची हिरो होंडा स्पेल्डर प्रो कंपनीची मोटार सायकल विना नंबर असलेली तिचा इंजिन नंबर HA10EGBHA04846 चेचिस नंबर खोडलेला असा असलेली जु. वा. कि. अ.
नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु. र. न. 646/2022 भा. द. वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मोटार सायकल)
6) 35,000/- रुपये किंमतीची HF डिलक्स मोटार सायकल बिना नंबर असलेली तिचा चेचीस क्रमाक MBLHAW101MS5E30309 इंजिन नंबर HA11EXM5E00257 असा असलेली जु वा. किं. अ.
7)35,000/- रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची पेंशन प्लॅस मोटार सायकल तिचेवर दिसता क्रंमाक MH-39-L-975 असा नंबर असलेली तिचा चेचीस नंबर 06G9C24701 पुढील क्रमाक खोडलेला व इंजिन नंबर 06G08M57079 असा असलेली जु. वा. किं. अ.840,000/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्पेल्डर प्लॅस मोटार सायकल तिचेवर दिसता क्रमाक MH-18-1143 असा असलेली व इंजिन नंबर HA10AGHSH06083 तिचा चेचीस नंबर खोडलेला असा असलेली जु. वा. किं. अ.
9) 35,000/- रुपये किंमतीची हिरो कंपनीची पेंशन प्रो मोटार सायकल तिचा दिसता क्रमांक MH-48-R-5675 इंजिन नंबर HATOENCHM50133 व चेचीस नंबर खोडलेला असा असलेली जु. वा. कि. अ.3.75,000 रुपये एकूण
( आरोपी नामे- सद्दाम शेख अजीज मिस्तरी याने भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे सिव्हील हास्पीटल जवळील घरकूल वसाहत येथून काढून दिल्याने जप्त) अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील तसेच विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या वरील वर्णनाच्या व 3,75,000/- रुपये किमतीच्या एकुण 10मोटारसायकली हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे. तसेच अटक करण्यात आलेले आरोपी यांचे अभिलेख तपासले असता आरोपी नामे 1) सद्दाम शेख अजीज मिस्तरी, वय 31 वर्ष, रा. चिराग गल्ली, नंदुरबार ह.मु. सिव्हील हॉस्पीटल जवळील घरकुल, नंदुरबार ता. जि. नंदुरबार असे असल्याचे सांगुन त्याचे सोबत आणखी एक इसम नामे 2) शहारुख शेख अजीज, वय- 28 वर्षे, रा. चिराग गल्ली नंदुरबार ता. जि. नंदुरबार याचविरुद्ध यापूर्वी उपनगर पोलीस ठाणे येथे 01 गुन्हा दाखल आहे.
सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसून नंदुरबार जिल्हयातून चोरी गेलेल्या इतर मोटारसायकली तसेच मोबाईल हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.
सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील सगो, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे साो, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन सा. यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती पवार, पोसई विकास गुंजाळ, पोहेकॉ जगदिश पवार, पोहेकॉ राजेश येलवे, पोहेका दिपक गोरे, पोना भटू धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना/ स्वप्निल पगारे, पोशि किरण मोरे, पोशि/ भालचंद्र जगताप, पोशि/ राहुल पांढारकर, पोशि/अनिल बड़े, पोशि इमान खाटीक, पोशि कल्पेश रामटके, पोशि युवराज राठोड, पोशि/ विशाल मराठे, पोशि/ प्रविण वसावे, पोशि हरीष काळी, मपोशि/ निवा वाघमोडे यांच्या पथकाने केली आहे.
Tags:
गुन्हे/अपराध