दी एन. डी.अँड एम वाय.सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच. जे. शाह.कनिष्ठ महाविद्यालय येथे स्काउड व गाईड स्थापना दिवस/वर्धापन दिन साजरा

नवापूर सत्यप्रकाश न्यूज                  येथील नवापूर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित द एन.डी.अँड एम. वाय.सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच. जे.
शाह कनिष्ठ महाविद्यालयात स्काऊट गाईड स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सन्मा. श्री संजय कुमार जाधव सर, उपमुख्याध्यापिका मा.श्रीमती कमल बेन परिख, उपप्राचार्य मा.श्री सुभाष निळ सर, उर्दू विभागाचे पर्यवेक्षक मा.श्री फारुख पटेल सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तथा राज्य गीताने झाली.मान्यवरांनी सरस्वती प्रतिमा पूजन तथा स्काऊट गाईड संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री विपुल प्रजापत सरांनी केली. स्काऊट गाईड प्रतिनिधींनी प्रार्थनेचे गायन केले व स्काऊट गाईड कर्तव्यांची माहिती श्रीमती आशाबेन चौधरी यांनी दिली. स्काऊट गाईडचे शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईडची प्रतिज्ञा घेतली. मुख्याध्यापक श्री संजय कुमार जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञेचे महत्त्व तथा आयुष्यात मेहनत करून स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार श्रीमती बिनीताबेन यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती निर्जला एम. सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post