नवापूर वाशियांचे स्वप्न मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर लवकरच करणार साकार, नेहरू उद्यान पुन्हा कार्यरत करणार

नवापूर सत्यप्रकाश न्यूज                  कित्येक दिवसांपासून शहरातील नेहरू उद्यानाचा कायापालट करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. उद्यानाच्या साफसफाईचे काम सुरू झाले आहे. अनेक वर्षांपासून उद्यानाच्या नूतनीकरणाची नागरिकांची मागणी होती. नेहरू उद्यान हा नवापूर शहरवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, या उद्यानाचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण करण्याची अपेक्षा सातत्याने व्यक्त करण्यात येत होती. नगरपालिकेमार्फत नेहरू उद्यान सुशोभीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता. पालिकेचे मुख्यधिकारी सप्नील मुघलवाडकर यांनी नियोजन करून उद्यानाची स्वच्छता सुरू केली आहे. नव्या वर्षात हे उद्यान नागरिकांसाठी खुले होणार असून नवीन आणि सुसज्ज सुविधा व मनोरंजनाची साधने देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल मुघलवाडकर यांनी दिली. नवापूर नगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नेहरू उद्यान हे नवापूर शहरातील नागरिकांसाठी ऑक्सिजन हब म्हणून ओळखले जाते. याठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासह व्यायामाची साधनेही बसवण्यात यावी अशी अपेक्षा शहरातील नागरिकांची आहे. याबाबत पाठपुरावाही करण्यात येत आहे. शहरातील एकमेव पालिकेचे नेहरु उद्यान आहे. हे उद्यान नेशनल हायवे ६ लगत असुन अडीच एकरात आहे. स्वतः मुख्यधिकारी सप्नील मुघलवाडर उभे राहुन काम करुन घेत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post