नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गाचे कामाची गती वाढेल का

नवापूर सत्यप्रकाश न्यूज              शहरात नागपूर ते सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम कासवगतीने सुरू असून शहरालगत उपजिल्हा रुग्णालय, प्रवेशद्वार व देवळफळी भागात मोठ्या प्रमाणावर अपूर्ण कामामुळे रहदारीने प्रचंड धुळीचे लोट उठून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने किमान शहरालगत रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या महामार्गाांच्या कामाला सुरुवातीपासूनच जमीन अधिग्रहण, ठेकेदारांनी काम अर्धवट सोडणे इत्यादी कारणांनी बराच उशीर झाला असताना सध्यस्थितीत काम करणाऱ्या कंपनीचे कामही शहरालगत वेग धरताना दिसून येत नाही. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर चिखल माखलेल्या रस्त्यांवरून वाहनधारकांना मार्गस्थ व्हावे लागत होते आज धुळीच्या लोटांनी वाहनधारक त्रस्त आहेत. महामार्गाचे काम करतांना नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चिंचपाडा व नवापूर रेल्वे गेट व शहरालगत उड्डाणपुलाचे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करून मोठ्या प्रमाणात होणारी वाहनांची कोंडी, रेल्वे गेट बंद असताना लागणान्या रांगा, वेळेचा अन् इंधनाचा अपव्यय टाळला जाऊ शकतो.
आतातरी ठेकेदारांनी शहरालगत भुयारीमार्ग असलेल्या उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यास आदर्शनगर, रंगेश्वर पार्क, लखानी पार्क, गणेश हील, वेडुभाऊ गोविंदभाई नगर तसेच उपजिल्हा रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना भुयारी मार्गातून मार्गस्थ होतांना दिलासा मिळेल. धुळीमुळे होणाऱ्या त्रासापासूनही सुटका होईल

Post a Comment

Previous Post Next Post