दिवाळीनिमित्त बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे आवाहन

नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज दिवाळीनिमित्त सद्या मुलांच्या शाळांना सुट्टया लागल्या असून बरेच नागरिक त्यांच्या मुळ गावाकडे. पर्यटन स्थळी फिरायला जाण्यासाठी किंवा नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गावी जात असतात. त्यामुळे रेल्वे स्थानक, बस स्थानक इत्यादी ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे मोबाईल, पाकिट व इतर मौल्यवान दागिने चोरीला जाण्याची शक्यता जास्त असते. तसेच बाहेर गावी किंवा पर्यटन स्थळी फिरायला जातांना, नागरिकांनीसतर्क राहून सावधानता बाळगणे आवश्यक आहे
सुट्टयांमध्ये नागरिक त्यांच्या मुळ गावी किंवा पर्यटन स्थळी फिरायला गेल्यामुळे अनेक दिवस घर बंद असतात. अशावेळी चोरट्यांच्या टोळ्या दिवसा बंद घरांची पाहणी करुन रात्री किंवा दिवसा बंद घरात चोरी करत असतात. यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी बाहेर गावी जातांना शेजाऱ्यांना व स्थानिक पोलीसांना अवगत करावे जेणे करुन त्या परिसरात पोलीसांच्या गस्ती दरम्यान अशा बंद घरांवर लक्ष ठेवता येईल. तसेच नागरिकांनी बाहेरगावी जातांना घरात मौल्यवान दागिने, किंमती ऐवज, रोख पैसे घरात ठेवण्याऐवजी बँकेतील लॉकरमध्ये ठेवावे. बाहेरगावी जातांना प्रवासादरम्यान देखील काही अनोळखी इसम प्रवाशांना बोलण्यात गुंवतून सामानाची किंवा इतर मौल्यवान दागिन्यांची चोरी करीत असतात. त्याचप्रमाणे प्रवास करतांना काही महिला दागिने परिधान करुन घराबाहेर पडत असतात. अशावेळी सोनसाखळी चोरीच्या (चैन स्नॅचिंग) घटना घडतअसतात. त्यामुळे प्रवास करताना महिलांनी शक्य असल्यास मौल्यवान दागिने परिधान करण्याचे टाळावे.. बाहेरगावी जातांना बरेच नागरिक समाज माध्यमांवर त्यांचे बाहेरगावी जातांनाचे स्टेटस ठेवत असतात. अनेक सराईत गुन्हेगार समाज माध्यमांवर क्रियाशिल असतात आणि याच संधीचा फायदा घेवून देखील बंद घरांमध्ये चोरी होण्याच्या घटना होत असतात. त्यामुळे समाज माध्यमांवर बाहेरगावी जात असतांनाचे स्टेट ठेवण्याचे नागरिकांनी टाळावे. कारण अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत.
बाजारात खरेदीसाठी जातांना नागरिकांनी त्यांचे मोबाईल, पाकिट इत्यादी वस्तु शर्टाच्या वरच्या खिशात ठेवू नये. तसेच बाजारात खरेदीसाठी जातांना काही महिला सोन्याचे मौल्यवान दागिने परिधान करून बाहेर पडतअसतात त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या (चैन स्नॅचिंग) घटना होत असतात. त्यामुळे नागरिकांनी मोबाईल. पाकिट इत्यादी वस्तु शर्टाच्या वरच्या खिशात न ठेवता पँटच्या खिशात ठेवाव्यात तसेच महिलांनी देखील बाजारात खरेदीसाठी जातांना सोन्याचे मौल्यवान दागिने परिधान करण्याचे शक्य असल्यास टाळावे.
  तसेच बाहेरगांवी जातांना मोटर सायकल सुरक्षीततेच्या दृष्टीने फक्त हॅण्डल लॉकवर अवलंबुन न राहाता किंवा वाहन घराच्या कंपाऊंडच्या आत लोखंडी साखळी कुलुपासह लावावीत. तसेच रात्रीच्या वेळेस आपली मोटर सायकल लॉक केल्यानंतर वाहनास कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाल्यास किंवा हात लावल्यास सेन्सरद्वारे मोठ्याने आवाजा होईल असे लॉक बाजारात अथवा ऑन-लाईन सहज उपलब्ध होतात, म्हणून जास्तीत जास्त नागरीकांनी ह्या लॉकचा वापर करावा करावा जेणे करुन आपली मोटर सायकल सुरक्षीत राहील.
    बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, रोख रक्कम घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी. घरात आवाज येण्यासाठी अलार्म सिस्टिम कार्यान्वीत करावी. घराला सेफ्टी ग्रील दरवाजा बसवावा. तसेच कॉलनी, वसाहत परिसरात विश्वासु सुरक्षा रक्षक नेमावा. अलीकडे चोरट्यांच्या टोळ्या चोरी करतांना CCTV कॅमेरा बंद करणे, CCTV कॅमेऱ्याचा DVR बंद करणे किंवा DVR चोरुन नेणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले CCTV कॅमेऱ्यांचा DVR सुरक्षित ठिकाणी बसवावा. तसेच कॉलनी, वसाहत परिसरात अनोळखी व्यक्ती किंवा कोणीही संशयास्पद परिस्थितीत फिरत असतांना आढळून आल्यास तात्काळ डायल-112 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला संपर्क करावा असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
   नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी सामुहीकरीत्या त्यांच्या वसाहतीमध्ये CCTV कॅमेरे बसवून घ्यावे, घरात आवाज येण्यासाठी दरवाजावर अलार्म सिस्टिम कार्यान्वीत करावी, घराला सेफ्टी ग्रील दरवाजा बसवावा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांनी बाहेर गावी जातांना शेजाऱ्यांना व स्थानिक पोलीसांना अवगत करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
पी.आर.पाटील भा.पो.से.पोलीस अधीक्षक, नंदुरबार

Post a Comment

Previous Post Next Post