आरोग्य धनसंपदासदरात आजीबाईचा बटव्यात डॉ.एम.बी.पवार यांचे पायाच्या नसामधे (पोटरी ) दुखणे.विषयावर मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ देवरे,नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्यूज 
विषय - पायाच्या नसामधे (पोटरी ) दुखणे.
       आपल्या शरिराचा महत्त्वाचा अवयव हा पाय  आहे. चालतांना आपल्या शरिराचे सर्व वजन पायाच्या तळवा आणि पोटरीवर पडते. कधी कधी आपल्या वाढलेल्या वजनाचा भार पायावर
पडतो. महिला आणि पुरुषामधे पायाची पोटरी दुखण्याची वेगवेगळी कारणे वयाप्रमाणे असतात. लहानपणापासून ते वृध्द व्यक्ती मधे पायाची पोटरी दुखते. त्याला कारणं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी. वागण्या बसण्याची, चालण्याच्या पध्दती 
आहेत.
     कारणे
१) वय आणि ऊंची नुसार जास्तच वाढलेले वजन आहे.
२) रोज रात्री झोप अपुरी घेणे.
३)रोज काम करतांना पायी जास्त चालणे.
४)आहारात पाणि कमी पिणे.
५)एकाच ठिकाणी जास्त उभे रहाणे.किंवा सतत बैठी काम करणे.
६)पायात रक्तप्रवाह अशक्तपणामुळे कमी होणे. शरिरात ब १२ व्हिटँमिन कमी, कँल्शियम, व्हिटँमिन डी कमी असणे.
७)महिलांना मासिक पाळीत पायाच्या पोटरीत सतत वेदना होतात.
 ८) महिला जास्त प्रमाणात चालतांना हिलटाँपच्या शँन्डल, बुट, चप्पल वापरतात. म्हणून पायाच्या पोटर्या दुखतात.
९)सतत जिन्यावरुन चढ उतार केल्याने त्रास होतो.
१०) काही स्रिया वा पुरुष सतत काम करतांना ८/१० तास साँक्स घट्ट बुट वापरतात. त्यांना टाचदुखी होते.
११)योग्य पादत्राणे वापरली नाही तर टाचेसह पोटरी दुखते.
  १२) पायात स्नायु आणि सांधे, हाड, अस्थिबंध, रक्तवाहिन्या मधिल अतिसुक्ष्मपेशी यांना प्रतिकारशक्ती कमी होणे.
 १३) अचानक होणारा अपघात झाल्यास पायात जास्त वेदना होते 
 १४)पायांना मुंग्या येणे, जळजळ होणे, आग होणे, हे डायबेटिज मधुमेहाचे कारण आहे.
१५) पायाच्या पोटरीच्या वेदना स्थानिक स्वरुपात नसतात. कधी खालच्या टाचा, पायाचा घोटा, पाया
ची बोटं, सारखे दुखतात. याला प्लाटार फँसिटायसिस म्हणतात. या वेदना खालच्या टाचेमधे होतात
१६) पाय दुखणे जुनाट तिव्र असल्यास Ostosporaisis संधीवात होतो.
१७)पायाची दुखणी फारच गुंतागुंतीच्या असतात. कधी बी 12 कमी. मँथेकोबालमिन डिफिसियन्सी मुळे पोटरीत रक्तातिल स्नायुमधे पेशी अशक्त होऊन नसा वर ओढाली जाते, नतंर पुर्ववत होते.
१८)शरिराचे वजन वाढुन लठ्ठपणा झाल्यास पोटरी दुखते.
१९) ब्लडप्रेशर वाढ. मधुमेह झाल्यास व्हेरिकोज व्हेन वाढतात.
२०) स्रियामधे गरोदर पणात विचार टेन्शन वाढुन ब्लडप्रेशर वाढते. म्हणून पायावर सुज, पोटरीत वेदना होतात.
पोटरीतिल वेदना - टाळण्यासाठी काय करावे
    १) वजन कमी करावे.
    २)महत्त्वाचे म्हणजे चप्पल बुट आपल्या पायाचे मापाचे वापरावे 
    ३)पायासाठी व्हिटमिन B12. Vit C आणि D याचा आहारात समावेश करावा. पाणी भरपूर प्यावे.
    ४)पाय दुखल्यास मसाज करावा.भरपूर व्यायाम .योगा. फिरावे.
    ५) फँनखाली झोपू नये. गार हवा बंद.
     ६) शेक घ्यावा.
     ७)जिवनपध्दती बदलावी.
     ८) पायाला स्ट्रेचिंग करावी.
     ९) भरपूर हसावे.सशक्त असावे.
   १०) डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
      रात्री पाय का दुखतात.
   दिवसभर जास्त शारिरीक  परिश्रम केल्यामुळे सहाजिकच अशक्तपणा आणि थकवा जाणवतो .कोणत्याही आजारात पाय दुखणे सर्वसामान्य लक्षण असते.रात्री झोपतांना पायाच्या पोटरीवरिल स्नायूंना रक्तप्रवाहात रक्तवाहिन्या मधे रक्तपेशीच्या पेशी सेलमधे तंतुका ह्या मंद गतीने प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे कार्य करतात.म्हणून पोटरीपासुन घोट्यापर्यत नसावर ताण पडतो.त्यामुळे टार्सल टँनल सिन्ड्रोम होऊन सायट़टिक नर्व्हवर दाब पडतो.तो थेट तळव्याच्या स्नायुमधे आग होणे.जळजळणे.
बर्यापैकी वेदना सुरु होतात.म्हणुन रात्री पायाच्या पोटरीही दुखतात.
नेहमी चुकिचे बसणे.व्यवस्थित चालत नाही.चालतांना इकडेतिकडे बघणे.खड्यात पाय पडणे,झट लागणे.चुकिचे झोपणे.
यामुळे पोटरी दुखतात.
      जास्त विचार.टेन्शन.ताणतणा
व .संताप.यामुळे विचार.संताप .
असमाधन यामुळे हृदयाचे ब्लडप्रेशर वाढते.रक्तवाहिन्यामधे क्लोरोस्टेराँल चरबी वाढुन पायाच्या नसावर ताणं पडल्यावर व्हेरिकोजव्हेन सुजतात.मधुमेह होतो.रक्तात .लघवी त शुगर निर्माण होते.मुत्रपिंडावर दाब पडल्यास पायाला सुज येते.पाय दुखतात.थकवा वाढतो.लघवीला भरपूर वेळा जावे लागते.पायात आग होते जळजळ होते.
        फँमिली डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
     रक्त लघवी .शुगर.क्लोरोस्टेराँ
ल.सिरम क्रियाँटिन.सिबिसी.तपा
सावी.पायाचे एक्स रे काढावे.
        उपचार 
  १) Tab Zeredol SP ----10---रोज १ रात्री 
  २) Tab Chemoryl fort ----10---वरिल प्रमाणे.
  ३) Cap,Methacalbumin with B12 -----10----वरिल प्रमाणे 
  ४) सँचेट  व्हिटँ.डी ३ ----८---एक कप दुधात एक दिवसानतंर .
  सकारात्मक जिवन  व्यतित करणे. हसा आणि आनंदी रहा.... प्राणायाम / योगासने / सकाळचा माँर्निग वाक / उपवास / पाणि भरपुर प्यावे / व्यायामही करावा.
मार्गदर्शक डॉ.एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाऊ देवरे




Post a Comment

Previous Post Next Post