येथे दिनांक 15/11/2023 रोजी जन-जाती गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात क्रीडा संकुल, खामगाव रोड, नंदुरबार येथे पार पडणार असून सदर कार्यक्रमासाठी महत्वाचे व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे जन जाती गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसह या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रास होवूनये. तसेच त्यांची गैरसोय टाळता यावी व वाहतूक सुरळीत राहावी याकरिता महोत्सवाकामी येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनंदाची पार्किंग व्यवस्था नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 1) आर.टी.ओ. ऑफीस परिसरातील मोकळी जागा 2) मिराज सिनेमाच्या बाजूला असलेल्या उभा हनुमान मंदीरासमोरील मोकळी जागा या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
सदर महोत्सवाकामी बाहेर जिल्हा व राज्यातूनबस तसेच मोठ्या खाजगी ट्रॅव्हल्सने येणारे नागरिक यांना चालकांनी नवापूर चौफुली मार्गेजिल्हा शल्य चिकीत्सक यांचे शासकीय निवास स्थानाच्या शेजारी असलेल्या रोडावर बनविण्यात आलेल्या कमानीजवळ उतरवून वाहने वर नमुद ठिकाणी पार्क करावी. तसेच खाजगी दुचाकी व चारचाकीवर वाहनाने येणारे नागरिक यांनी त्यांची वाहने वर नमुद दोन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणी पार्किंग करुननवापूर चौफुली जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे शासकीय निवासस्थान शेजारी बनविण्यात आलेल्या कमानीतून कार्यक्रम स्थळी पायी जातील.
महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने महोत्सव परिसर व रस्त्यांवर किंवा इतरत्र पार्किंग करु नये याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
Tags:
सामाजिक