दिवाळी गोरगरीबांसोबतची कर सल्लागार पंकज भामरे यांची गोरगरीबांसाठी दिवाळी, उपक्रमाचे अनेकांकडून होतंय कौतुक

नाशिक सत्यप्रकाश न्यूज 
          समाजात अनेक दानशूर लोक असून आणि प्रत्येक जण गोरगरीब, गरजू यांच्याकरिता आप-आपल्या परीने शक्य ती मदत करून, आपलं सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. 
   अशाच प्रकारे नाशिक येथील,व्यवसायाने "कर सल्लागार" असलेले साधारण कुटुंबातील पंकज भामरे व परिवार, "साईबाबा फाऊंडेशनच्या" माध्यमातून गेल्या १३ वर्षापासून सातत्याने गोरगरीबांसोबत दिवाळी साजरी करत आहेत.
नुकतेच ऑक्टोबर मध्ये पंकज भामरे यांच्या वडिलाचे दुःखद निधन झाले असताना, स्वतःचे दुःख बाजूला सारून त्यांनी, गरीब लोकांसाठी यावर्षी देखील लाडू व चिवडा पाकिटे तयार करून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, रस्त्यावरील गरीब दिसेल त्याला फराळाचे पाकीट देऊन तोंड गोड करून त्याच्या सोबत दिवाळी साजरी करून आनंद दिला. 
   याचबरोबर रिमांड होम येथील मुला-मुलींना दिवाळी फराळाचे पाकीट देऊन तोंड गोड करण्यात आले.
  साईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज भामरे यांनी यावेळी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, *माझे वडील प्रा. शिक्षक कै. हेमराज सोनार गुरुजी हे देखील दिवाळीत आम्हाला याकामी मदत करत असत, आमच्या या उपक्रमामुळे त्यांना अत्यंत आनंद होत असे. आमचे हे कार्य सातत्याने दरवर्षी चालूच राहील आणि आमच्या या सामाजिक व गरीब लोकांसाठीचे कार्य पाहून आमचे वडील जिथे असतील तिथे सुखावतीलच.
  या कामी विशेष सहकार्य करसल्लागार सौ. विशाखा भामरे, श्रध्दा जाधव, स्वराज खैरनार, मीत शिंपी, रीहान करडी, नील भामरे यांनी घेतले फाऊंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post