नवापूर सत्यप्रकाश न्युज
तालुक्यातील खांडबारा जि. नंदूरबार येथील अशोक टेलरचे मालक श्री. दिलीप मोहन शिंपी यांनी शिंपी समाजाचे नाव रोषण केले आहे व शिंपी समाजाला एक सिनेसृष्टीतील महान हस्ती पर्यंत पोहचविले कारण "कौन बनेगा करोडपती" सुप्रशिध्द सिनेमा कलाकार मा. श्री. अमिताभजी बच्चन यांच्या सोबत स्क्रीनवर आलेल्या प्रश्नाची अचूक उत्तरे दिली व निवड झाली. हे चित्रीकरण दिनांक १८.१०.२०२३ रोजी मुंबई येथे झाले. ते चित्रीकरण दिनांक १२.१२.२०२३ मंगळवार रोजी सोनी टीव्हीवर रात्री ९.०० वाजता दाखवण्यात येणार आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा न विसरता पाहावा. या कार्यक्रमात त्यांना ₹ ६.४० लाख मिळाले आहे. यापूर्वी त्यांची मराठीतून प्रसारित होणाऱ्या "कोण बनेल करोडपती" यात सुध्दा निवड झाली होती. श्री. दिलीप शिंपी हे एक समाजातील पहिली व्यक्ती आहे की ज्यांची निवड करण्यात आली. मध्यवर्ती संस्थतर्फे खूप खूप मनःपुर्वक शुभेच्छा व अभिनंदन.
Tags:
यश/निवड