गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी निर्देश सर्वप्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
दिनांक 11/12/2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा दोंडाईचा रोडवर के. एन. पेट्रोलपंपाचे बाजुला असलेल्या काठियावाडी ढाब्यावर एक आयशर क्रमांक यु.पी.57 ए.टी. 9679 उभा असुन त्यात अवैधरित्या देशी विदेशी दारु वाहतुकीसाठी असलेबाबत माहीती मिळाली. त्यावरून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदर माहिती शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना देवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्यानुसारशहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी एक पथक तयार करुन बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी तात्काळ रवाना केले.
मिळालेल्या बातमीच्या आधारे शहादा पोलीस ठाण्याचेपथकानेशहादा दोंडाईचा रोडवर के. एन. पेट्र ोलपंपाचे बाजुला असलेल्या काठियावाडी ढाब्याजवळ सापळा रचला. सदर ढाब्यावर बरेचसे वाहने उभे दिसले. त्या वाहनांमध्ये बातमीतील आयशर क्रमांक यु.पी.57 ए.टी. 9679 ही दिसुन आली. सदर वाहनाजवळ जावुन पथकाने पाहीले असता त्यावरील चालक हा वाहनाचे कॅबीन मध्ये झोपलेला दिसला. त्यास उठवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शरनकुमार भिराराम गोधारा, वय-23 वर्षे, रा. उडुसन ता. सांचोर जि. जालोर (राजस्थान) असे सांगितले. पथकाने त्यास वाहनात काय भरले आहे ?याबाबत विचारपूस केली असता, त्याने वाहनात इलेक्ट्रॉनिक वस्तु असल्याचे सांगुण तसे ई वे बिल दाखविले. सदर माल हुबळी (कर्नाटक) येथुन भरुन तो उदयपुर राजस्थान येथे घेवुन जात असल्याचे सांगीतले. परंतु मिळालेली बातमी खात्रीशीर असल्याने पथकाने सदर आयशन वाहन क्रमांक यु.पी.57 ए.टी. 9679 हे शहादा पोलीस ठाणे येथे आणून वाहनाची तपासणी केली असता ते सिलबंद दिसुन आले. सदर वाहनाचे सिल उघडून खात्री केली असता त्यात खाकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारुच्या सिलबंद वाटल्या आढळून आल्या त्याचे वर्णन व किमत खालील प्रमाणे.
1) 14 लाख 40 हजार रुपये किमतीचे Imperial Blue Blender Grain Whisky चे 400 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम. एल. च्या एकुण 19,200 नग काचेच्या बाटल्या.
2) 14 लाख 40 हजार रुपये किमतीचे Royal Blue Mall Whisky चे 300 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम.एल.च्या एकुण 14,400 नग काचेच्या बाटल्या.
3) 3 लाख 88 हजार 80/- रुपये किमतीचे Royal Challange Finest Premium Whisky चे 98 खाकी रंगाचे खोके, त्यात 750 एम.एल.च्या एकुण 1176 नग काचेच्या बाटल्या.
4) 99 हजार 360/- रुपये किमतीचे Evergreen Reserve Whishy चे 23 खाकी रंगाचे खोके, त्यात 750 एम.एल.च्या एकुण 276 नग काचेच्या बाटल्या.
5) 10 लाख रुपये किमतीचा एक आयशर क्रमांक यू.पी.57 ए.टी. 9679
असा एकुण 43 लाख 67 हजार 440 रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी नामे 1) शरनकुमार भिराराम गोधारा, वय-23 वर्षे, रा. डडुसन ता. सांचोर जि. जालोर (राजस्थान) यास ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे इतर साथीदार नामे 2) कालुभाई ऊर्फ सरफराज अहेमद रियासल अली रा. पैयकवली लाला सुकरावली कृषी नगर उत्तर प्रदेश 3) सत्तार ठाकरे व 4) विजय ठाकरे दोन्ही रा. शहादा ता. शहादा जि. नंदुरबारमहाराष्ट्र असे असल्याचे सांगीतल्याने त्याचेवर राज्यात प्रतिबंधीत असलेली गोवा बनावटीची दारु, खोटे बनावट E-way Bill बनवून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून अवैध विदेशी दारु विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 699/2023 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108, सह भा.द.वि. कलम 420, 468, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आलेला आहे.
Tags:
गुन्हे/अपराध