नवापूर नगर हॉल पूर्ववत करण्यासाठी नाभिक समाजाचे पालिकेला निवेदन

नवापूर - सत्यप्रकाश न्युज : 
   शहरात लाखो रुपये खर्च करून शहरासाठी तयार केलेले व दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करून अपूर्णअवस्थेत असलेले  पालिकेचे व शहरातील एकमेव टाऊन हॉल कार्यक्रमांसाठी सुस्थितीत नागरिकांना मिळत नाही. टाऊन हॉल कार्यक्रमांना पूर्वी प्रमाणे मिळावा. आधी कमी रकमेत चांगली सुविधा उपलब्ध होती, आता पालिकेने टाऊन हॉल चे भाडे अव्वाच्यासव्वा केले मात्र सुविधा नाहीत, घ्यायचे तर घ्या अन्यथा जा असा अरेरावी करणाऱ्या पालिका प्रशासनाला आज नवापूर येथिल श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेच्या वतीने टाऊन हॉल सुस्थितीत मिळण्याबाबत चे निवेदन कार्यालय अधीक्षक श्री देसाई यांना दिले. 
   निवेदन देण्यासाठी श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेचे पदाधिकारी अशोक सैंदाणे, विश्वास सोनवणे, अनिल वारूडे, किशोर मोरे, प्रशांत हिरे, मनोज बोरसे, प्रदिप हिरे, प्रविण सैंदाणे, दिपक सोनवणे, सतिष मोरे, जितेंद्र वारुडे, सुनिल महाले,  उपस्थित होते. 
   सदर निवेदनात म्हटले आहे की नवापूर शहरातील शहरातील एकमेव टाऊन हॉल लग्न समारंभ अथवा इतर कार्यक्रमांसाठी भाडे तत्वावर मिळते, मात्र सद्य परिस्थिती पाहता नागरिकांना पालिका प्रशासन सहकार्य करत नाही. अवाच्यासव्वा भाडे देऊन ही वरच्या मजल्यावर स्टेज व हॉल मध्ये विद्युत पुरवठा, स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. नागरिकांना वैयक्तिक स्वच्छता करणे शक्य नाही, त्यामुळे टाऊन हॉल घेण्यासाठी लोक टाळाटाळ करतात, यात पालिकेचे बी आर्थिक नुकसान होते,  नवापूर नगर पालिकेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक टाऊन हॉल हे नागरिकांना वापरण्यासाठी  सुस्थितीत मिळावे, पूर्वीप्रमाणे ज्या कोणाला शुभ कार्यासाठी अथवा इतर कामासाठी टाऊन हॉल आवश्यक असेल त्यांना नगरपालिकेने ठरवून दिलेले भाडे भरल्यानंतर वापरासाठी मिळत होता. कोरोनाच्या काळात टाऊन हॉलचा वापर हा वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी करण्यात आला होता. कोरोनाचा काळ संपल्यानंतर आता टाऊन हॉल पुन्हा पूर्वस्थितीत शहरातील अथवा तालुक्यातील कुणालाही कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्यासाठी पालिकेने सुस्थितीत उपलब्ध करून द्यावा. पालिका पूर्वी आयोजकांना टाऊन हॉल देण्याआधी तो साफसफाई करून सुस्थितीत देत होते. आताही टाऊन हॉल देताना स्वच्छता गृह, हॉल, विद्युत व्यवस्था सुरळीत असावी, स्वच्छतागृह स्वच्छ करून मिळावेत. विद्युत पुरवठा बंद झाल्यास कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून जनरेटरची व्यवस्था असावी. टाऊन हॉल च्या जनरेटर मध्ये बिघाड झाला असेल तर तो दुरुस्ती करून मिळावा.  जेणेकरून आयोजकांना कार्यक्रमात कुठलीही अडचण येणार नाही. याबाबत आपण तात्काळ कारवाई करून तो आवश्यक त्यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावा.  अन्यथा याबाबत आंदोलन करण्यात येईल. यात कायदा व सुव्यवस्थाला बाधा आल्यास यास सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहाल असा इशारा देण्यात आला आहे. 
सदर निवेदन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित पवार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नवापूर पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आले आहे. 


निवेदनावर श्री संत सेना महाराज नाभिक समाजाचे अध्यक्ष सुधिर निकम, उपाध्यक्ष मुकेश वारुडे, कोषाध्यक्ष अशोक सैंदाणे, सदस्य विश्वास सोनवणे, अनिल वारूडे, किशोर मोरे, प्रशांत हिरे, मनोज बोरसे, अनिल वारुडे, प्रदिप हिरे, संदिप हिरे, 
 प्रविण सैंदाणे, संदेश सोनवणे, जितेंद्र भदाणे ,राहुल मोरे, श्रीकांत मोरे, जयेश मोरे, संदिप सोनवणे, सतिष मोरे, विजय, सुनिल महाले यांच्यासह समाजबांधव यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले. 


.

Post a Comment

Previous Post Next Post