एड्स चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तरुणाईने नैतिक मर्यादांचे पालन करावे - प्रा. राजेंद्र पाठक

नवापूर सत्यप्रकाश न्युज
   येथील आदिवासी सेवा सहाय्यक आणि शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय नवापूर आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.1डिसेंबर 2023 रोजी एड्स निर्मूलनासाठी प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.
     या प्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक श्री राजेंद्र पाठक यांनी एड्स व्हायरस बद्दल माहिती देत एचआयव्हीच्या संक्रमणाचे माध्यम विशद करत एडस् रोगाबद्दल जनमानसात असणाऱ्या गैरसमजुती विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.या विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी प्राणीशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. सोनल सावंत हिने उपस्थितांना एड्स दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. या  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंग्रजी विभागाचे प्रा. ए ए मुळे यांनी तर प्रास्ताविक रा से यो कार्यक्रम अधिकारी डॉ सुरेखा बनसोडे यांनी केले 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ ए जी जयस्वाल उपप्राचार्य वाय जी भदाणे, व डॉ मंदा गावित यांनी मार्गदर्शन केले. या एड्स जनजागृती उपक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post