आजच्या आरोग्यम धनसंपदा सदरातील आजिबाईचा बटव्यात पायाचे कॉर्न,भरपूठ या विषयावर डॉ एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक

   नाशिक सत्यप्रकाश न्युज 
                   आजिबाईचा बटवा 
     विषय - पायाचे काँर्न.अर्थात भरपुट
  प्रश्नकर्ते - श्री.शांताराम पाटील.दोनगांव.परभणी.
     १) फुटकाँर्न म्हणजे काय ?
    २)फुटकाँर्न कश्यामुळे होतात.
   ३) भरपुटं ची लक्षणे कोणती ?
   ४) भरपुटं प्रतिबंध .कुठे होतात
   ५) काँर्नवर उपचार ?
         सर ! 
    शरिरावरिल त्वचा सर्व ठिकाणी सारखी नसते.हातापायावर तळव्यावर  घर्षणामुळे ती त्वचा टणक.जाड.कणखर असते.नाकात सेन्सेटिव्ह तर इतर  जागी सर्वसामान्य असते.नैसर्गिक रित्या त्वचेचे प्रकार आहेत.
       फुटकाँर्न म्हणजे भरपुटं अथवा काँलस होय.पायावर किंवा
हातावर घर्षणाने एक लहान गोल
आकाराचा उंच भाग तयार होतो.त्यात सुज .वेदना होऊन काही दिवसांनी सेप्टिक पु .खराब रक्त साचुन काँर्न फुट तयार होतो.असे हातावरही होऊ शकते.कधी चालतांना असह्य वेदना.टुचल्यासारखे होते.यावर वेळीच उपचार करावे.
      कार्न म्हणजे शरिरातिल त्वचेला जाड .टणक .कडक झालेला थर असतो.घर्षण किंवा दाब देऊन चालणे.त्यावेळी ह्या कणखर त्वचेवर काटा.दगड.
लाकडाचा .काचेचा बारिक कण टोचुन बाहेर निघाला नाही.तो बरेच दिवस पायात राहिला तर
भरपुट .काँर्न तयार होतो.जोपर्यंत आपणांस स्पर्शाने वेदना होत नाही
तो पर्यत काढण्याची गरज नसते.
जर तुम्ही निरोगी असाल तर काँर्न अथवा काँलस वर उपचार करण्याची गरज नसते.जर सतत वेदना.सुज असेल तर रिमुव्ह करावे लागते.
         फुटकाँर्न लक्षणे 
   १)पाय हलवतांना .चालतांना सतत त्रास होतो.
  २)नेहमी पाय वा हातावर नेहमी वेदना .त्रास होणे.
  ३)अंगठ्याभोवती सुज.लालसर
पणा.टणक त्वचा होते.
  ४)त्वचेवर कोरडा वँक्सचा थर तयार होतो.
  ५)पायाच्या तळव्यामागे भरपुटं जास्त येतात.
      फुटकाँर्न कश्यामुळे होतात.
      १) पायाला वा हाताला कोणतिही न दिसणारी काच.मातीचा कण.लाकडाची शिळ.टोचली .ती शरिरात पायाच्या तळव्यात असली तर काही दिवसांनी भरपुट काँर्न होतो
   २)संपुर्ण शरिराचा दाब पायावर जास्त पडुन टोचलेल्या भागात काँर्न तयार होतो.
   ३) तुमच्या पायाच्या आकारापेक्षा लहान बुट .साँक्स.चप्पल वापरली तर काँर्न तयार होतो.
   ३)जन्मजात पायात विकृती असु शकते.
  ४)उंच टाचेची सँण्डल.बुट.चप्पल वापरणे.
   ५) अनवाणी चालणे.फिरतांना बुट.चप्पल नसली तर काँर्न होतो.
   ६)बागेत.शेतात.बुट न घालता कामं करणे.
  ७)खेळतांना- चालतांना काटा.लाकडाची शिळ पायात गेली तर काँर्न होतो.
   ८)हा विकार वयवर्ष ४५ते ६० पर्यत होत असतो.
      फुटकाँर्न पासुन मुक्ती 
   १) रोज सकाळी अंघोळ करतांना हातपायांना साबणाने धुवुन कोरड्या रुमालाने स्वच्छ करावेत.
   २) बुट चप्पल पादत्राणे वय आणि उंची प्रमाणे घ्यावी.
    ३)तुटलेले बुट.चप्पल जास्त वापरु नका.
   ४)पायात काटा.शिळ.काच तुकडा असल्यास त्यास काढावा.
   ५) अनवाणी चालु नका.
      वैद्यकीय सल्ला 
   १) काँर्न .भरपुट मधे सतत वेदना.चालतांना भयंकर त्रास टोच
ल्यासारखे वाटते .पुन्हा दुसरे होत आहे.सेप्टिक होऊन लालसर झाले तर डाँक्टरांना भेटा.
   २)आपणांस मधुमेह .हायब्लड
प्रेशर .असह्य वेदना होत आहेत.तेव्हा डाँक्टरांना दाखवा.
  ३)आपणांस चालतांना वेदना होत आहे.तर डाँक्टरांना दाखवा.
       फुटकाँर्न उपचार 
   १)अँक्युप्रेशर ने बरे होऊ शकते
   २)सुज दुर करण्यास बर्फाने शेकावे.
   ३)मेडिकल दुकानातुन का़र्न पँक घेऊन लालरिंगचा भाग काँर्नवर लावा.ते मऊ होऊन सुज कमी होते.मऊ होते.
   ४)डाँक्टर ते मऊ झालेले काँर्न स्केलपेल ब्लेड ने बधिर करुन कापतात .ड्रेसिंग करतात.
   ५)काँर्नमधे सेप्टिक असेल तर प्रतिजैविक औषधाने फरक पडतो
   ६)पायाच्या बोटात जन्मजात काँर्न हाडापर्यत असेल तर शस्रक्रियाने काढु शकतात.
   ७)अंधोळ करतांना पाय स्वच्छ धुवावेत.
  ८)चालतांना पायावर दाब कमी करावा.पायाचे तळवे घासुन चालु नये.
   ९)बुटामधे चामडी जिभ वापरावी.साँक्स काँटन वापरावे.
  १०)फुटस्क्रँब वापरा.
   ११)पायाचे तळवे .हाताला रोज रात्री झोपतांना व्हसलिन .मोहरी
तेल लावा.
  १२) जेवणात व्हिटँमिन अ.क.ड.घ्यावे.
   १३) आपल्या फँमिली डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
   १४) पायांची निगा राखावी.हाताच्या तळव्यावर रात्री झोपतांना तेल लावा.
मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी ,नाशिक 
     

Post a Comment

Previous Post Next Post