महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू आहे, या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल शतकमहोत्सवानिमित्त कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. विधानपरिषद सभागृह, विधान भवन, नागपूर येथे सर्व विद्यमान सदस्य तसेच नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत "महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या विधान परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखक,, साहित्यिक, कवी, अशा महान मान्यवर सदस्य होते, हुशार व बुद्धिमान लोकांचे हे वरिष्ठ सभागृह, या सभागृहातील सदस्यांचे भाषण ऐकण्यासाठी विधानसभेचे अनेक आमदार गॅलरीमध्ये येऊन बसत व आपल्या ज्ञानामध्ये भर करून टिपणी काढत होते, व त्याचा फायदा त्यांना खालील सभागृहासाठी होत असे, , मान्यवरांच्या मनोगतातून समजले. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार महाराष्ट्र राज्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम ताई गो-हे यांच्या हस्ते कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर तसेच उपस्थित आमदारांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Tags:
शासकीय