नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. वी. जी. शेखर पाटील हे दिनांक 27/12/2023 पासून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. या वार्षिक तपासणी दरम्यान विविध उपक्रमांचे व नुतनीकरण झालेल्या वास्तुंचे यावेळी उद्घाटन करण्यात येत आहे. दरम्यान त्यांनी दिनांक 29/12/2023 रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा उप विभागीय कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आलेल्या कार्यलयाचे उद्घाटन केले. त्यावेळी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
नंदुरबार पोलीसांनी अनेक ना उघड गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासोबत कायदा व सुव्यवस्था तसेच ना उघड गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासोबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस वसाहत, पोलीस ठाणे व इतर इमारतींचे अद्यावतीकरण सुरु केले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी अक्कलकुवा उप विभागीय कार्यालयाला येथे भेट दिली असता, अक्कलकुवा उप विभागीय कार्यालय अत्यंत जीर्ण झालेली असून ते पडक्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांना अक्कलकुवा उप विभागीय कार्यालयाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करणेबाबत सांगितले, त्याप्रमाणे अक्कलकुवा उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी नुतनीकरण करणेबाबतचा प्रस्ताव नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचेकडे सादर केला त्यांनी देखील त्यावर तात्काळ कारवाई करत नतुनीकरण करणेसाठी सहमती दिली.त्यानुसार अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे मार्फतीने संबंधीत विभाग यांचेकडे संबंधीत विभागाशी पत्रव्यावहार करुन निधी उपलब्ध करुन दिला व सुसज्ज असे अद्ययावत इमारतीचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ.श्री.बी.जी. शेखर पाटील यांचे हस्ते दिनांक 29/12/2023 रोजी करण्यात आले.
वार्षिक तपासणीसाठी उपस्थित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव व कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्ताबाबत योग्य त्या सूचना दिल्या. तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून पोलीस व जनता संबंध अधिक वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरुन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांच्या पोलीस ठाणे हद्दीत घडणाऱ्या सर्व लहान मोठ्या घटनांची माहिती मिळेल आणि त्यावर वेळीच उपाययोजना करणे सोईचे होईल.
त्यानंतर अक्कलकुवा उप विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी यांच्या मुलाखती घेऊन अक्कलकुवा, तळोदा व मोलगी पोलीस ठाण्याला दाखल गुन्ह्यांचा व पोलीस अधिकारी यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी त्यानंतर अक्कलकुवा उप विभागातील गुन्हे अभिलेख, गोपनीय अभिलेख, विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल यांची पाहणी केली.
सदर वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी.जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, अक्कलकुवा उपविभागातील सर्व दुय्यम पोलीस अधिकारी उपस्थित होते.
Tags:
शासकीय