नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. हे दिनांक 27/12/2023 पासून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. या वार्षिक तपासणी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा, गुन्हे आढावा यांचेसह नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून दिनांक 29/12/2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित केली होती, मोटार सायकल चालवितांना हेल्मेटचा वापर करुन जनतेमध्ये जनजागृती करणे हा या मोटार सायकल रेलीमागील मुख्य उद्देश होता. सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जो, शेखर पाटील यांचेसह नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव यांचेसह नंदुरबार उप विभागातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 100 पोलीस अधिकारी व अमंलदार हेल्मेटसह सहभागी झाले होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित हेल्मेट जनजागृती रॅली पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत देवून रॅलीचा उत्साह वाढविला.
सदर मोटार सायकल रॅलीला शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक देविदास पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखविला, मोटार सायकल रेली समोर पोलीस बैंड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून लोकांमध्ये व रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले, सदरची रॅली ही नंदुरबार शहरातील पंडीत नेहरु पुतळा, म. गांधी पुतळा, सिथी कॉलनी, C.B. पेट्रोल पंप, वाकाचार रस्ता, हातोडा पूल तळोदा पोलीस ठाणे या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण तळोदा पोलीस ठाणे येथे सदर रॅलीचा समारोप इगला. सुमारे 20 कि.मी. रॅलीने संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा पोलीस दलाच्यावतीने
काढण्यात आलेल्या मोटार सायकल रॅलीने जणू काही एक प्रकारे सुरक्षेची हमी दिली. मोटार सायकल रॅलीतील सहभागी पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांनी हेल्मेटबाबत जनजागृती केली
सदरची मोटार सायकल रॅली चालू असतांना रॅलीच्या मार्गावर उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये मोटार सायकल रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून मोटार सायकल रॅलीचे मनोबल वाढवत होते.
सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री. बी. जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 100 पोलीस अधिकारी व अमंलदार ह्या हेल्मेटसह रॅलीला उपस्थित होते.
Tags:
शासकीय