परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील हे दिनांक 27/12/2023 पासून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत, या वार्षिक तपासणी दरम्यान विविध उपक्रमांचे व नुतनीकरण झालेल्या वास्तूंचे यावेळी उद्घाटन करण्यात येत आहे.
संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांना शोधून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी एक कॅमेरा पोलीसांसाठी हा उपक्रम सुरु करण्याची संकल्पना नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी मांडली होती, त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पो. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांची बैठक घेवून त्यांना या उपक्रमाचे महत्व सांगून त्यांनी लावलेल्या CCTV कैमेऱ्यांपैकी एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन द्यावा असे आवाहन केले होते.
जिल्ह्यातील विविध व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांनी पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी लाचालेल्या CCTV कैमे-यांपैकी एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन दिला. जिल्ह्यात असे एकूण 324 CCTV पोलीस दलासाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत, तळोदा शहरात 15 व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांनी प्रत्येकी एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत.
एक कंमेरा पोलीसांसाठी या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले CCTV कैमेन्याचे मुख्य नियंत्रण कक्ष तळोदा पोलीस ठाणे येथे असून त्याचे उद्घाटन आज दिनांक 29/12/2023 रोजी नाशिक परिक्षेत्राचेविशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले को, सर्वप्रथम एक कॅमेरा पोलीसांसाठी याउपक्रमासाठी तळोदा शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांनी जिल्हा पोलीस दलास केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले, कारण एखादी योजना किंवा संकल्पना कागदावर असून चालत नाही तर ती प्रत्यक्षात अंमलात आणली गेली पाहिजे आणि ते काम तळोदा शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांनी करुन दाखविले, संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात लोकसहभागातून 7200 सी.सी.टी.व्ही. बसविण्यात नाशिक परिक्षेत्राला यश आले आहे. नागरिकांची सुरक्षा करणे हे पोलीसांचे प्रथम कर्तव्य आहे. कायदा व सुव्यवस्था राखेणे, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे इत्यादी कामांसाठीच पोलीस दल अस्तित्वात आलेले आहे. या सर्व कामांसाठी कॅमेरा हा अत्यंत उपयुक्त व महत्वाचा घटक आहे. माझा देश, माझी सचोटी एक कॅमेरा पोलीसांसाठी हा उपक्रम परिक्षेत्रातील सर्व व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांनी केलेल्या सहकार्यातून पूर्ण करुन दाखविले आहे, सी.सी.टी.व्ही. कॅमे-याला कायद्यात आधार असून त्याचा पुरावा म्हणून मा. न्यायालयात ग्राह्य धरला जातो. संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांना शोधून त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा महत्वाचा घटक आहे. कारण सी.सी.टी.व्ही. कॅमेरा जे सत्य असेल तेच समोर मांडतो. प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या घटना वेळीच पोलीसांना सांगितल्यामुळे भविष्यात होणाऱ्या मोठ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आवश्यक आहे" असे यावेळी सांगितले,
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले को, गुन्हा घडल्यानंतर आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस दलामार्फत वेगवेगळ्या पध्दतीचा वापर आज पावेतो करण्यात आलेला आहे. सद्याच्या आधुनिक युगात सराईत गुन्हेगार गुन्हा करण्याच्या पध्दतीत नेहमी बदल करून गुन्हा करतांना अधिक काळजी घेतात. अशावेळी आरोपीतांचा शोध घेण्यासाठी वेळोवेळी पोलीसांमार्फत सो.सी.टी.व्ही. कंमेन्याचा उपयोग केला जातो, परंतु बाढती लोकसंख्या व शहरीकरणामुळे सर्वच ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कमेरे आढळून येत नाही. समाजात घडणा-या चांगल्या किंवा वाईट घटनांचे करता आले तर संभाव्य गुन्ह्यांना आळा घालता येवू शकतो तसेच झालेले गुन्हे उघड करण्यासाठी सी.सी.टी.व्ही. कॅमे-यांची मोठ्या प्रमाणात मदत होते, तळोदा शहरातील सर्व व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, आस्थापनांचे मालक यांच्या सहकार्याने एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमासाठी 15 कॅमेरे उपलब्ध दिले तसेच आणखीन 06 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमासाठी कार्यान्वी करण्यात येणार असल्यामुळे सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी व त्यांचा शोध घेण्यासाठी निश्चितच होईल असे सांगितले. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणारा एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमासाठी जिल्ह्यातील विविध व्यापारी, दुकारदार, व्यावसायीक, विविध आस्थापना यांनी पोलीस दलासाठी एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन दिल्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलास मोलाचे सहकार्य केले याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले,यानंतर एक कॅमेरा पोलीसांसाठी या उपक्रमांतर्गत एक कॅमेरा पोलीसांसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल 1) यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक श्री. शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांचेसह अक्कलकुवा उप विभागातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, तळोदा शहरातील ग्रामस्त व इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags:
शासकीय