परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील हे दिनांक 27/12/2023 ते दिनांक 30/12/2023 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. दरम्यान त्यांनी दिनांक 28/12/2023 रोजी त्यांनी म्हसावद पोलीस ठाणे येथे भेट देवून म्हसावद पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. त्यावेळी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पो.आर. पाटील यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री.बी. जी. शेखर पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी. जी. शेखर पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे आवार, परिसर पाहून पोलीस ठाण्यातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर म्हसावद पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, गोपनीय अभिलेख, विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमालयांची पाहणी केली.म्हसावद पोलीस ठाण्याचा गुन्हे आढावा घेत असतांना विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील यांचे असे निदर्शनास आले की, म्हसावद पोलोस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असून शरीराविरुच्चे किरकोळ स्वरुपाचे गुन्हें अधिक आहे. त्यामुळे पोलीसांनी गाव पातळीवर जास्तीत जास्त वेळ थांबून गावात कायदेविषयक जनजागृती करावी. तसेच म्हसावद येथून धडगांव व तोरणमाळ येथे जाण्यासाठी घाट रस्ता असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी घाटात सतत गस्त करुन वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत मार्गदर्शन करावे. तसेच म्हसावद पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असलेल्या कामाचा आढावा घेवून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सतर्क राहून आपले दैनंदिन कर्तव्य करणेबाबत सूचना केल्या.भेटी दरम्यान म्हसावद पोलीस ठाण्यासमोरील मोकळे पटांगण पाहून विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी उपस्थित्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सांगितले की, "पोलीस दलात दैनंदिन काम करीत असतांना कामाच्या अतिरीक्त ताणामुळे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे आपल्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे
कायमच दुर्लक्ष होत असते. त्या सर्वातून बाहेर पडून प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्याकडे काळजीपूर्वक लक्षसहकार्याची गरज असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीमुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची जास्तीत जास्त लोकसंख्या खेड्यांमध्ये एकवटलेली आहे. पूर्वी खेड्या गावांची अवस्था खुप वाईट होती, परंतु कालांतराने शहरांप्रमाणेच खेड्या गावांचा देखील विकास होत गेला. त्यामुळे खेड्या गावांमध्ये देखील गुन्हेगारी वाढू लागली. समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था राहावी, प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी पोलीस दल महत्वाची भूमिका बजावितो. रायखेड ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस दलास रायखेड गावात पोलीस चौकी उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन एक चांगली इमारत उभी केली. त्यामुळे म्हसावद पोलीसांची जवाबदारी देखील वाढलेली असून पोलीस प्रशासन आता अधिक गतिमानपणे काम करेल " अशी अपेक्षा व्यक्त करुनरायखेड पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करुन एक भव्य इमारत उभी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे रायखेड गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की," रायखेड पोलीस चौको अंतर्गत एकूण 17 गार्वाचा समावेश असून रावखेड हे गाव महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते, परिसरातील नागरिक येथे बाजारानिमित्त येत असतात तसेच रायखेड येवून मध्यप्रदेश राज्यात जाणारा महामार्ग असल्यामुळे येथे अवजड वाहनांची देखील वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे काही वेळेस वाहतूकोचा खोळंबा होवून नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय होत असते. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस दलाची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीसांना सतत तेथे थांबणे आवश्यक असते. नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीमुळे नागरिकांना वेळीच मदत होणार असून नागरिकांना निश्चितच याचा फायदा होणार आहे. रायखेड पोलीस चोकीची इमारत ज्या ठिकाणी उभी आहे त्याठिकाणी अगोदर घाणिचे साम्राज्य होते, परंतु रायखेड ग्रामस्थ व म्हसावद पोलीसांच्या मेहनतीमुळे आज तेथे सुरक्षेचे मंदिर उभे राहिले आहे "असल्याचे सांगून रायखेड पोलीस चौकीसाठा मोलाचे सहकार्य करणारे रायखेड गावाचे सरपंच श्रीमती उषाबाई ठाकरे, उपसरपंच श्री. मुन्ना पाटोन, श्र कैलास पाटील माजी सरपंच, प्रतिष्ठीत नागरिक श्री. हिरालाल पाटील, श्री. मुकेश टाटोया, श्री. अशोक जैन, श्रा शांतीलाल बाफना व समस्त रायखेड प्रामस्थांचे आभार व्यक्त करुन अभिनंदन केले.
रायखेड गावातनवीन पोलीस चौकोचे उद्घाटन झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिलेल्या सूचनांबद्दल म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे यांनी जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आभार व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दल भविष्यात देखील अशीच भरीव कामगिरी करुन नागरिकांना तात्काळ मदत करु असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलीस उप अधीक्षक श्री. ढिकले, श्री. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, म्हसावदपोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजन मोरे, रायखेड गावाचे सरपंच श्रीमती उषाबाई ठाकरे, उपसरपंच श्री. मुन्ना पाटील, श्री. कैलास पाटील माजी सरपंच, प्रतिष्ठीत नागरिक श्री. हिरालाल पाटील, श्री. मुकेश टाटीया, श्री. अशोक जैन, श्री. शांतीलाल बाफना यांचेसह रायखेड गावातील नागरिक व म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.
Tags:
शासकीय