नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील शास्त्रीनगर भागातुन रात्री Spilender कंपनीची मोटरसायकल नं.MH- 39-AF-7947 सौ.भारती राजेंद्र कासार यांचा मालकीची मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरी केली असून शास्त्रीनगर भागातल्या रात्रंदिवस सुरू असलेल्या रहदारी असलेल्या व 24 वर्दळ असलेल्या भागात चोरी होणे हे आश्चर्याची गोष्ट आहे.
नवापूर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आता शहरात लावलेल्या सी.सी.कॅमेरयांची शास्त्रीनगर भागात देखील लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.जर 24 तास वाहणाऱ्या रस्त्यावरून मोटरसायक ची चोरी होते तर भविष्यात काही ही घडू शकते.
आपल्या मोटरसायकल चोरी फिर्याद नवापूर पोलिस ठाण्यात दिली असून नवापूर पोलिस लवकरच मोटरसायकलचा तपास करतील अशी अपेक्षा कासार परिवाराकडून होत आहे.
Tags:
गुन्हे/अपघात