प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगले काम करावे, एक दुसर्यांना मदत करणे सोबत भजन, कीर्तन, पूजा, पुण्य करा, हे सर्व करत असताना स्वतःमध्ये कधीही अहंकाराला घर करु देऊ नका. जेव्हा मनात अहंकार निर्माण होतो, तेव्हा अधःपतानाला सुरुवात होते. तो अहंकार पैशांचा असो, शक्तीचा असो किंवा मग सुंदरतेचा असो, अहंकाराचे हरण हे होतच असते. त्यामुळे जोपर्यंत अहंकार नष्ट होणार नाही, तोपर्यंत शिवप्राप्तीची विभुती होणार नाही. शिवप्राप्तीची अनुभूती घेण्यासाठी अहंकाराचे हरण होणे गरजेचे असल्याचेही पंडीत मिश्रा यांनी सांगितले.
भक्तांना झाले अश्रू अनावर
कथेचा शेवटचा असल्याने आणि कथा सकाळी असल्याने शहरातील भक्तांनी सकाळी 4-00 वाजेपासून घरातुन कथा स्थळी जाण्यासाठी निघाले होते काही भक्तांनी कथा स्थळी मुक्काम केला होता व रात्री भजन कीर्तनचा लाभ घेत भजनाचा तालावर नाचण्याचा देखील आनंद घेतला.
यावेळेस अनेक महिला भाविक भावुक झाल्याचे चित्र कथेच्या ठिकाणी दिसून आले. कथेच्या शेवटची आरती सुरु असताना, अनेक महिलांना अश्रु अनावर झाले होते. भविष्यात गिरणा माता, महादेवाने पुन्हा संधी दिली तर जळगावात पुन्हा कथेसाठी येईल अशी ग्वाही पंडीत मिश्रा यांनी दिली.
Tags:
धार्मिक