नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी असामाजिक तत्वांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
दिनांक 11/12/2023 रोजो नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कलकोट ते सोनगड रस्त्याचे दरम्यान रुस्तम गामीत हा त्यांचे राहते घरी जुगाराचा खेळ खेळवित आहे. सदरची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना कळवून एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील लक्कलकोट ते सोनगड रस्त्याचे दरम्यान रुस्तम गामीत यांचे राहते घराजवळ जावुन खात्री केली असता तेथे काही मोटार कार संशयीतरित्या लावलेल्या दिसून आल्या.म्हणून पथकांनी त्याठिकाणी छापा टाकला असता तेथे जमीनीवर एकूण 18 इसम 52 पत्त्यांचा झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना मिळून आले, त्यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
1) 4 लाख 5 हजार रुपये रोख
2) 43 लाख रुपये किमतीचे 5 हुंदाई कंपनीचे चारचाकी वाहने
असा एकुण 47 लाख 05 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार खेळणारे 1) रुस्तम जमनादास गामीत 2) निखीलकुमार भिकुभाई शेठ 3) चिंतन प्रकाशभाई देसाई4) पंकज गोरख चौधरी5) विनोद अनंतराव चंद्रात्रे 6) शैलेश पुष्करभाई अग्रवाल7) सुनिलभाई चिमनभाई अडतिया 8) सुनिलभाई प्रल्हादभाई शर्मा 9) हितेश हसमुखभाई अडतिया 10) पारसकुमार वसंतभाई मनवाणी 11) जितेंद्रकुमार हिरालाल अमृतीया 12) कामेश अनिलभाई शेठ 13) अनिल हरीशंकर तिवारी 14) केवीनभाई गिरीषभाई देसाई 15) रशिदभाई युसुफभाई मलीक 16) हितेशभाई रमणिकभाई विटलाणी (ठक्कर) 17) दिपन हरकांतभाई पाठक 18) निलेश जयराम गामीत यांचेविरुद् नवापूर पोलीस ठाणे येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, विशाल सोनवणे यांचे सह सहा. पोलीस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी, पोलीस हवालदार दिनेशकुमार वसुले, महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे, पोलीस शिपाई गणेश बच्छे, विक्की वाघ, किशोर वळवी व संजय बोरसे यांच्या पथकाने केली आहे.
Tags:
गुन्हे/अपराध