नवापूर - सत्यप्रकाश न्युज
शहरातील जनता पार्क येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनांक 3 मार्च रविवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आले .
आपले आराध्य श्री गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रकट दिनाचे औचित्य साधून भाविकांची दर्शनासाठी सकाळ पासूनच गर्दी सुरू केली होती.
यावेळेस दुपारी १२.३०वाजता होम हवन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तदनंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाउ गावीत व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.संगिता गावीत यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्याची आली व दुपारी महाप्रसादाचा शहरातील गजानन महाराजांच्या भक्तांनी लाभ घेतला .
सदर कार्यक्रमास आ.शिरिषकुमार नाईक व शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी महाराजांचा दर्शनाचा लाभ घेतला.
Tags:
धार्मिक