आरोग्य धनसंपदा
विषय - स्रीयांचे मानसिक आरोग्य
१) स्रीयांचे मानसिक आजार कोणते असतात ?
२) मानसिक आजार हे शारिरीक व्याधी निर्माण करतात ?
३) घरातिल मुख्य आधारस्तंभ
कोण असते ? एक स्री ?
प्रश्न -- सौ. ज्योती काळे,
उपसरपंच - विणपुर , जालना.
काळ बदलला.व्यक्तीत बदल झाला.आपणही बदललो.आज स्री
समाजात,राजकारणात .औद्योगिक शिक्षणात,वैज्ञानिक विचारात .
शैक्षणिक प्रगतीत , जागतिक प्रवाहात मानानं प्रगतीला चालना देऊन स्वतःच्या विकासाला पुढे नेत घरातली आधारस्तंभ होऊन
देशाच्या प्रगतीसाठी सिंहाचा वाटा
निर्माण करित आहेत.
खरंच ! स्रीयांची सहनशक्ती फार मोठी असते.ती एका बाळाची आई ! एका व्यक्तीची भार्या !! एका माणसाची बहिण !!! अशी संवेदनाशील नाती परमेश्वराने तिच्या आजुबाजूला निर्माण केली.
धन्य त्या मातेला ! लाखो सलाम!!
अश्या मातेला मानसिक आजार असतो.तो म्हणजे संवेदना
भावना,विचार,वर्तन,काळजी,चिंता,फोबिया,घाबरणे,दचकने.संशय
असमाधान,वैचारिकता यामुळे
शरिरातिल अवयवाची बिघाड निर्माण होऊन तिचे दैनंदिन ,वैय
क्तिक आणि सामाजिक,घरगुती
आयुष्यात काही वेळा मध्यम आणि तिव्र स्वरुपात शारिरीक व
मानसिक आरोग्याच्या अडचणी आपोआप निर्माण होतात.उदाः-
नैराश्य,चिंता,भ्रम,भावनायुक्त आजार म्हणजे स्किझोफ्रेनियाँ तयार होऊ शकतो.
स्रीयांच मानसिक समाधान
कश्यात असते ? हे कुणालाही
सांगता येणार नाही.कारण पाच पैकी एक तरी महिलेला चिंता आणि तिच्या जिवनात आलेले बहुतेक वेळा नैराश्य असते, प्रत्येक स्रिला पुरुषापेक्षा जास्त तणावं .चिंता,काळजी,संशय
नावाचे विकार जास्त असतात.
त्या मनाने हळव्या,सोशिक,हसहृ
दयापासुन प्रेम करणाऱ्या ,भावनि
क मनस्थिती,घाबरट,वैचारिक जास्त असतात,पुरुषाचं मन निर्धा
स्त . कठोर ,निगरगठ्ठ,होईल,करेल
,बघुन घेऊ,बिनधास्त असते,
खरं म्हणजे .स्रियांच्या आयु
ष्यात काही बदल हे वयात येतांना
सुरवातीला मासिकपाळीच्या वेळी
होत असतात.नतंर वैवाहीक जिवनातील गर्भारपण,त्यानतंर काही दिवसांनी प्रसुती होऊन वया
च्या शेवटी मासिक पाळी जातांना
- बंद होतांना त्यांचे आजार हे
मानसिक व शारिरीक क्षिणता.
अशक्तपणा ,हिमोग्लोबिन कमतरता,हायपरटेन्शन,शुगर,
क्लोरोस्टेराँल कमी , कंबरदुखणे,
गुडघ्याचा चालतांना त्रास होणे.हे आपोआपच होतांना जाणवतात.
जिवनातिल सुरवातीला
स्रियामधे स्रित्व प्रकट करणारे २
हार्मोन्स स्राव गर्भाशयात तयार होतात. - इस्ट्रोजेन,प्रोजेस्टेराँन .
शरिरातिल प्रत्येक तयार होणारा हार्मोन्स मेंदुशी, मज्जारज्जु,पेशी.
रक्तवाहिन्यातिल पेशी,मज्जातंतुत
निगडीत असल्यामुळे सर्व च
हार्मोन्सचा मेंदुवर परिणाम होतो,
पाळीच्या वेळी अथवा नतंर
शारिरीक संतुलन बिघडल्याने
मानसिक,उदासिनता,भित्रेपणा,
वैचारिकता ,संतापीपणा मनअस्वस्थ होऊन शरिर जड वाटते,चिडचिडपणा,उदास,निरउ
त्साह होऊन,झोपेचा त्रास होतो.
त्यातही गर्भारपणात स्रि आनंदी,स
माधानी असणे,अपेक्षित असते.
पण काही स्रिया अस्वस्थ ,असमा
धान सतत उदासिन,भिती वाटते.
८० टक्के स्रियांना प्रसुती नतंर गोधंळल्यासारखे वाटते.त्रासामुळे
रडु येते.थकवा वाटतो.मग हळुहळु १० दिवसानतंर महिला अगदी सामान्य होतात.
स्रियांच्या आरोग्यावर शारिरीक व मानसिकता अवलंबून असते.तिच्या स्थैर्यावर कुटुंबाचे ,
घराण्याचे,समाजाचे,देशाचे.भवितव्य अवलंबून असते.त्यामुळे पुरुषां
नी स्रियांची मानसिक आरोग्याची काळजी घेणे.महत्त्वाचे आहे.ती एक जननी,एक माता,घरातिल कर्ता,जगाचा ऊध्दार करणारी माता असते.
स्रियांची मनस्थिती सतत चिंताग्रस्त असते.तिला कधी स्वतः
चा स्वतः ला भरवसा नसतो.
कारण ती सतत उद्याचा,भविष्या
चा विचार करते.मुलांना संस्कार ,
संस्कृती ,सुसंस्कृत करुन घराचा
समाजाचा देशाचा एक उत्कृष्ट
नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न
करित असते.लहानपणी वडिल,
तरुणपणी नवरा आणि उतारवया
त चिरंजीव यांच्या जिवनात ती
सदैव समरस होत असते.
स्रियाची मनस्थिती कधी
मनस्तापाने चिंताग्रस्त.वैचारिकता,
असमाधान,इतर व्याधी,ब्लडप्रेशर.
शुगर,कंबर,गुडघेदुखी,फँटस् वाढ
झाल्यानंतरच्या आयुष्यात तिला
*स्क्रिनोफ्रेजिया* नावाचा मनोविकार तयार होऊन आजार
पण वाढते,अश्या उतारवयात तिला मानसिक आधाराची फार
गरज असते.
वयाच्या ४५ नतंर स्रियांनी आपली शारिरीक आरोग्य* यांची तपासणी दर ३ ते ५ वर्षांनी करुन शारिरीक निरोगी जिवन जगावे.
स्रि हिच घरातिल महत्त्वाचे आधारस्तंभ आहे ! येणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्तानं त्यांना लाखो सलाम !!
मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी,नाशिक
.
Tags:
आरोग्य