नवापूर सत्यप्रकाश न्युज
महिला दिनाचे औचित्य साधून संवेदन फाउंडेशन नवापूर च्या सर्व महिला भगिनींतर्फे दिनांक 9 मार्च रोजी महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्टॉल लावलेल्या उपस्थित महिला भगिनींमधून वयाने ज्येष्ठ भगिनीच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी संवेदन फाउंडेशनच्या प्रा. डाॅ. मंदा मोरे, सौ नीतू शर्मा प्रा. कविता खैरनार, प्रा. कमल शाह, चित्रा सोनवणे, रूपाली जगताप, नीलिमा शेटे, मनीषा गिरासे, शैला शिंपी, बबिता जयस्वाल, जयश्री निकम, निर्मला चौधरी, सुनंदा खैरनार, ममता वळवी आदि उपस्थित होते . या रोजगार मिळाव्यामध्ये विविध घरगुती खाद्यपदार्थ तसेच वडे, पापड, सौंदर्यप्रसाधने, पितळाचे भांडे असे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले. याप्रसंगी एकूण 48 स्टॉल लावण्यात आले. दरवर्षी संवेदन फाउंडेशन तर्फे महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा या रोजगार मेळाव्याला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यामेळाव्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिला भगिनींनी अत्यंत आनंदाने अनेक स्टॉल वरील वस्तूंची खरेदी विक्री केली व या मेळाव्याचा मनापासून आनंद लुटला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संवेदन फाउंडेशनच्या सर्व महिला भगिनींनी परिश्रम घेतले
Tags:
सामाजिक