नवापूर - सत्यप्रकाश न्युज
आज दि. 29.04.2024 रोजी नगपालिका टाऊन हॅाल नवापूर येथे नवापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ) यांची मतदारांना वाटप करावयाच्या मतदार माहिती चिठ्ठी ( Voter Information Slip ) वाटपाबाबत मतदार नोंदणी अधिकारी श्री.गणेश मिसाळ यांचे अध्यक्षतेखाली मार्गदर्शनपर बैठक घेण्यात आली.
या बैठकीसाठी नवापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचे बीएलओ आणि बीएलओ पर्यवेक्षक तसेच सेक्टर ऑफीसर उपस्थित होते. या प्रसंगी बीएलओ यांना मतदारांना वाटप करावयाचे मतदार माहिती चिठ्ठी ( Voter Information Slip ) , स्लिप वाटप केल्याबाबत मतदारांची पोहोच घेण्यासाठीचे रजिष्टर आणि अद्यावत मतदार यादी तसेच अल्फाबेटीकल मतदार यादीचे वाटप करणेत आले. Voter Information Slip मध्ये मतदारास त्याचे मतदान केंद्र कोणते , त्या केंद्राचा क्रमांक, केंद्रातील मतदार यादीत मतदाराचा अनुक्रमांक , मतदान कधी आणि मतदानाची वेळ इ .तपशील एका बाजूस आणि दुसऱ्या बाजूस मतदान केंद्राचा नकाशा आणि मतदारासाठी सूचना आहेत.
Voter Information Slips चे वाटप बी. एल. ओ. यांनी दिनांक 29.04.2023 ते दिनांक 07.05.2023 या कालावधीत पूर्ण करतील. बी.एल.ओ. पर्यवेक्षक आणि सेक्टर ऑफिसर या कामावर पर्यवेक्षण करणार आहेत.
दररोजची स्लिप वितरणाची प्रगतिशील स्लिप्स वाटपाची बीएलओ आपले पर्यवेक्षक यांना देतील.त्यानुसार माहिती तहसिल कार्यालयात संकलित होईल.मा. निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार स्लिप्स वाटप मतदानाच्या पाच दिवस आधी पूर्ण करायचे आहे यासाठी वाटप दिनांक 7 मे पर्यंत पूर्ण करणेत येईल.
मतदानाचे दिवशी Voter Information Slip सोबतच मतदारांनी मा. निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे इतर 12 ओळखीचे पुरावे पैकी एक पुरावा सोबत आणायचा आहे.
प्रत्येक स्लीप वर आयोगाने एक विशिष्ट QR कोड दिला आहे. हा कोड बूथ ॲप किंवा वोटर हेल्पलाइन ॲप याद्वारे स्कॅन करून मतदारांना त्यांचा मतदान केंद्र, अनु क्रमांक याची माहिती मिळते.
दि. 7 मे पर्यंत वाटप न झालेल्या स्लिप्स व स्लिप वाटप रजिष्टर बी.एल.ओ. यांनी दि. 9 मे / 10 मे पुर्वी पर्यवेक्षकांमार्फत तहसिल कार्यालयात जमा करतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वाटप न झालेल्या स्लिप्स सीलबंद पाकीटात ठेवतील. त्यानंतर पुन्हा या स्लिप्स चे वाटप करणेत येणार नाही. मतदारांनी याबाबत नोंद घेऊन आपली मतदार माहिती स्लिप संबंधित बीएलओ यांचेकडून संकलित करून घेण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी श्री. गणेश मिसाळ यांनी केले आहे.
Tags:
निवडणूक