आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात डॉ एम.बी.पवार यांचे प्रोस्टेट ग्रंथी या विषयावर मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
आरोग्य धनसंपदा ग्रुप आजिबाईचा बटवा 
     विषय - प्रोस्टेट ग्रंथी.
   आजीबाईचा बटवा या सदरात आपण गेल्या ३ वर्षापासुन शरीर निरोगी रहाण्यासाठी सतत वेगवेग
ळ्या विषयावर सर्वसामान्य ज्ञान घेऊन आपल्या, शा रीरिक आजारपणाची
माहिती घेऊन मेडिसिनही सुचवत असतो.तरी आपण आपल्या फँमिली फिजिशियनचा सल्ला घेणेही महत्त्वाचे असते.आज इतर बाजारु मेडिसिनचा जाहिरात बाजीने अंदाजे औषधी घेणे.चुकिचे असते .शरीराला ते
कधीही अपायकारक असते.
 त्यासाठी कधीही माहिती वाचावी पणं औषधी उपाय हे नेहमी विचारांती घ्यावे.त्यासाठी फँमीली फिजिशियनचा सल्ला घेणे.अतिशय योग्य असते.
          आपली लेखांक मालिका महाराष्ट्रात प्रत्येक जिह्यात - दर रविवारी सकाळी ५ वाजता नियमित प्रकाशित होते.घरोघरी प्रश्नमंजुषेद्वारे मोफत औषोधोपचार घेतले जातात . 
      प्रश्न - श्री.एस्.के.कामंत.वाणी गल्ली.मालवणं.सिंधुदुर्ग.महाराष्ट्र .
        प्रोस्टेट ग्रंथी हि पुरुषामधे  जननेद्रियाजवळ असणारी एक
आक्रोडच्या आकाराची असते.ती शिश्न आणि मुत्राशयामधे असते.
प्रोस्टेट ग्रंथीमुळे सिमेन /विर्यात या ग्रंथीकडुन एक द्रव्य सोडले जाते.त्यामुळे शुक्रजंतुला /स्पर्मला
सतत पोषण मिळते.ही ग्रंथी वाढल्यामुळे मुत्रमार्गातिल रक्तवाहिन्या रुंदावतात.व ही ग्रंथी युरेथ्रा मुत्रवाहक नलिकेजवळ असते.
              वाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथीची वाढ सुरु असते.पण त्यातही काहीवेळा उतारवयात त्रास होतो.काही वृध्दांना होत नाही.तर काहिंना भयंकर स्वरुपात शारीरिक .मानसिक त्रासअसह्य होतो.
      सर्वसाधारण वय ५० वर्ष त्यापुढे किंवा उतारवयात ह्या ग्रंथीची वाढ होते.ती स्वाभाविक होते.
बहुतेक वृध्दांना त्रास होतो.जर शरिरात कुठलाही त्रास असेल तर
तो वैद्यकीय सल्ल्याने आपण दुर केला पाहिजे.नाही तर इतर भोंदुगीरी उपचार.अघोरी उपचार यामुळे वाढ होऊन आजार त्रासदायक होऊन असह्य वेदना होतात.
प्रोस्टेट वाढलेल्या नव्वद टक्के लोकांना आँपरेशन्सची गरज नाही सुरवातीला काही दिवस औषोधोपचार योग्य केल्यास कायमस्वरुपी फरक पडतो.
      सुरवातीला लक्षणे
  १) लघवीला घाई होणे.
  २) लघवी अडखळते.
   ३) लघवी पुर्ण झाल्याचे समाधान होत नाही.
   ४) लघवीला सतत घाई लागते.
   ५)लघवीला नियंत्रण रहात नाही
कपडे ओले होतात.
    ६) लघवीचा प्रवाह अचानक सुरु होतो.आणि मधेच थांबतो.
  ७) लघवी अर्धवट झाल्यासारखे वाटते.
    ८) लघवी करतांना वेदना होतात.कधी रक्त येते.लालसर होते
    ९) प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मुत्र
वाहकमार्ग युरेथ्रा अरुंद होतो.त्या
मुळे लघवीवर परिणाम होतो.
       *प्रोस्टेट ग्रंथी कारणे*
    १) प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचे निश्चित कारणं कधीही कळतं नाही.पण हे सर्व उतारवयात होते.
    २) उतारवयात पुरुषांमधील टेस्टेराँन हार्मोन्स बदलते.त्यामुळे टेस्टिकुलर सेल्स पेशीमधे बदल
होत असतो,हे ग्रंथी वाढीचे कारणे असतात.
     ३) संशोधनातुन असे दिसले की ज्या पुरुषांचे अंडकोष काही कारणास्तव काढले गेले असेल तर
त्यांना प्रोस्टेट ग्रंथीची समस्या होत नाही.
     ४) ७५ वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषामधे ही समस्या जास्त जाणवते.पण जास्त 
रिस्क नसते.
    ५) काही व्यक्ती जर नियमित कारण नसतांना अँसिडिटीच्या मेडिसिन घेणे,मज्जासंस्थेवर कार्य 
करणारी औषधी ,उदा.- डोके दुखी.झोपेच्या ,वेदना कमी होण्याच्याऔषधी,दमा,पोटाशी संबंधीत
मेडिसिन जास्त खाल्यास उतारवयात प्रोस्टेटग्रंथी वाढतात.
     ६) अँलोपँथी औषधामुळे मुत्राशयाच्या स्नायुंचे आकुंचन मंदावते,शक्यतो अँन्टिकोलेजेनिक
औषधी जास्त घेऊ नये.
     ७) तरुणवयात मुक्त लैंगिक संबधामुळे / योग्य काळजी घेतली नाही.त्यामुळे उतारवयात मुत्रमार्गात जंतुसंसर्ग वाढतो.हे एक महत्त्वाचे कारणं असते.
     ८) एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोस्टेटग्रंथी वाढ होत असल्यास डाँक्टरांशी मनमोकळे बोलावे.जर 
मुत्रवाहिनीवर दाब येऊन अडथळे निर्माण होत असतिल ,किंवा मुत्र वाहक नलिकेत खडे युरिन स्टोन UrineStone होण्याची शक्यता जास्त असते,
       ९) कधी लघवी पुर्ण होत नसल्यास शरीरातुन बाहेर टाकावयाची उत्सुर्जुक द्रव्ये शरीरात साचुन
रहातात.त्यामुळे रक्त दुषित होऊन
*युरेमियाँ* आजार होत असतो.
              आहार
सर्व प्रकारची फळे.पालकभाजी.फळांचा ज्युस. टोमँटो,दही.दुग्धजन्
य पदार्थ .बाजरी.पेज.पाणी भरपूर खावेत.विचार ,संताप टेन्शन बंद
       काय खाऊ नये  
दारु,मटन,चिकन.मसालेदार.गरमागरम.चटकदार.मिरची .चटणी.मासे बंद.
          निदान व तपासणी
     १)  प्रोस्टेटग्रंथीचे निदान हे आजारपणाची लक्षणे ,शारीरिक तपासणी आणि इतर कारणे आढळल्यास बिनधास्त, न संकोच करता डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
उदाः- लघवी करतांना त्रास.युरेथ्राला अडथळा असणे.अथवा कँन्सर
ची शंका,इत्यादी विचारात घ्यावी.
     २) निदान करण्यासाठी आपली सखोल माहिती.इतिहास,
इतर कारणे.कधीपासुन त्रास आहेहे सर्व स्पष्ट युराँलाँजिस्ट डाँ.सांगा.
     ३) युराँलाँजिस्ट डाँक्टर किंवा शल्यचिकित्सक व्यक्तीच्या गुदद्वारात बोटं टाकून प्रोस्टेटग्रंथीची
तपासणी करतात.यामुळे आकार आणि सुज लक्षात येते.बी.पी,एच झालेल्या रुग्णांना प्रोस्टेट गुळगुळीत व  रबराप्रमाणे लवचिक लागते.मुत्रविकार तज्ञ
डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
       शारीरिक तपासणी सह अँल्ट्रा साऊंड आणि प्रोस्टेट स्पेसिफिक अँन्टिजन अथवा पीएसए ही रक्तातील करावी.लक्षणे किती गंभीर आहेत.यानुसार उपचार असतो.लक्षणे सौम्य असल्यास विषेश उपचाराची गरज नसते.अँल्फाब्लाँकर्स मेडिसिन वापरतात.त्यामुळे पुष्कळआराममिळतो.उपचाराने बराच त्रास कमी होतो,मनापासून औषोधोपचार करावा.निरोगी होतो.
मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक 
          

Post a Comment

Previous Post Next Post