सृष्टीत सर्वशक्तिमान कर्ताकरवित्ता परमेश्वरच असून, त्याच्या इच्छेनुसार सारे काही घडत असते. त्यामुळे मानवाने, मग तो कुणीही असो एखादे कार्य आपल्यामुळे संपत्र झाले, असा अहंकार बाळगू नये, अन्यथा ते कार्य केल्याचे फल प्राप्त होत नाही. अहंकार हा मानसिक आजार असून, तो वैद्यकीय साधनांनी नव्हे तर देव, धर्म आणि संतांच्या सहवासातूनच बरा होऊ शकतो, असे मार्गदर्शनपर विचार धर्मचरण स्वामी यांनी येथील स्वामिनारायण संस्कारधामात पुनः मूर्ती प्राणप्रविष्ठा महोत्सवात बोलताना व्यक्त केले.
महंत स्वामी महाराजांच्या हस्ते कणाद सुरत येथून पूजन करून आणलेल्या नवापूर शहरातील श्री साईनगरीतील बीएपीएस स्वामिनारायण संस्कारधामात भगवान स्वामिनारायण, गुणातीतानंद स्वामी, भगवान श्रीराम सीता, हनुमान, भगवान शंकर-पार्वती, गणपती, कृष्ण-राधा यांच्या नूतन मूर्तीचा पुनःप्राणप्रतिष्ठा विधी धर्मचरण स्वामींच्या हस्ते झाला.
भगवतसेवा स्वामी यांनी मंत्रपठण केले. या वेळी चिन्मय स्वामी, परमपुरुष स्वामी, योगेश स्वामी, भगवत सेवा स्वामी, विशालमुनी स्वामी, देवरत्न स्वामी, शुभदर्शन स्वामी, प्रभुवंदन स्वामी, कृणाल अहिर, विपिनभाई चोखावाला, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावित आदीसह भाविक उपस्थित होते, धर्मचरण स्वामी म्हणाले, की जीवनात प्रमुख स्वामी महाराजांनी कुठलेही कार्य करताना ते आपण करीत नसून परमेश्वर माझ्याद्वारे करवून घेत आहेत अशीच समर्पणाची भावना कायम ठेवली. म्हणूनच जगभरात स्वामिनारायण संप्रदायाचे भक्तिकार्य सुरू झाले. अहंकार, ईर्षा लोभ, मत्सर हे मानवी मनाचे शत्रूच नव्हे तर मानसिक आजार आहेत. अन्य आजार वैद्यकीय साधनांनी बरे होतात; परंतु मानसिकता बदलण्यासाठी जीवनात ईश्वरभक्तीचे संपूर्ण समर्पण, सनातन हिंदू धर्मग्रंथांचे चाचन, चिंतन आणि आकलन तसेच संतांचा सहवास अत्यंत आवश्यक असतो. देव व धर्मकार्याची लालसा एखाद्या नास्तिक किंवा स्वार्थी मनुष्याचेही जीवन बदलून परोपकारी बनवू शकतात. स्वामिनारायण संप्रदायात संतांच्या सहवासातूनच अनेक उव्यविद्या व उच्चपद विभूषित व्यक्ती आज स्वतः संत होऊन
त्यागमय जीवनाद्वारे धर्म कार्य करीत
आहेत हे एक मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. चिन्मय स्वामी म्हणाले, की मंदिर,धर्मशास्त्र व संत हे हिंदू संस्कृतीचे आधार असून, हा आधार भक्कम असेल तोवर संस्कृती शाश्वत राहील, मंदिर म्हणजे केवळ इमारत नसून सकारात्मक ऊर्जेचा एक स्रोत आहे. प्रत्येक मंदिरात भगवंताच्या शक्तीचा अंश असतो, जो भाविकांना योग्य मार्ग दाखवीत असतो, शिक्षणाने मानव फक्त शिक्षित होऊ शकतो; परंतु देव, संत आणि धर्मग्रंथ या सर्वांच्या माध्यमातून व्यक्ती सुशिक्षित व सुसंस्कृतही बनतो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट करून दर्शवून दिले. या वेळी योगेष्टश स्वामी यांनीही मनोगत व्यक्त केले.
बाळमंडळातर्फे मंदिर ईश्वरकी पहेचान' या कीर्तनावर नृत्य सादर करण्यात आले. महिला मंडळाच्या भगिनींनी ८५ प्रकारचे मिष्ठात्र तयार केलेल्या पदार्याची आकर्षक मांडणी करून नैवेद्य दाखविण्यात आला.
प्रदीप प्रजापत यांनी प्रास्ताविक केले. कमलेश पार्टील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. आर. आर. पाठक यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी स्वामिनारायण सत्संग मंडळ, महिला मंडळ व युवक मंडळाने प्रयत्न केले.
Tags:
धार्मिक