येथील मार्च एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित वनिता विद्यालयातील रितवी हरीश बोरसे हिची जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झाली ती नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
कु. रितवीला प्राचार्य चंद्रकांत शेटे, वनिता विद्यालयातील वर्गशिक्षक व विषयशिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. कु.रितवी हि सेवानिवृत्त भालेराव बोरसे यांची नात असुन नवापूर येथील अशरफभाई लाखाणी गुजराती माध्यमिक विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक हरीश बोरसे व मृणाली बोरसे यांची ती कन्या आणि व्यारा येथील SBI life insurance चे Devalopment Maneger गिरीश बोरसे यांची पुतणी आहे. कु.रितवीचे नातेवाईक व मित्रपरिवाराकडून कौतुक होत आहे.
Tags:
यश /निवड